१0४ लेटलतीफ कर्मचा-यांना शोकॉज
By Admin | Updated: December 4, 2014 00:48 IST2014-12-04T00:48:06+5:302014-12-04T00:48:06+5:30
बुलडाणा जिल्हाधिकारी अधिका-यांना थम्ब मशीनचा झटका.

१0४ लेटलतीफ कर्मचा-यांना शोकॉज
बुलडाणा : कर्मचार्यांच्या वेळेची माहिती ठेवण्यासाठी प्रत्येक शासकीय कार्यालयांनी थम्ब मशीन लावली आहे. या मशीनमध्ये कर्मचार्यांची उपस्थिती नोंदविली जात असून, जिल्हाधिकारी कार्यालयातील मशीनचा अहवाल पाहून लेटलतीफ १0४ कर्मचार्यांना जिल्हाधिकारी चिंतामणी जोशी यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात १५ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर दरम्यानचा थम्ब मशीनच्या अहवालाची तपासणी केली असता १0४ कर्मचारी हे सकाळी येताना किंवा संध्याकाळी जाताना कार्यालयीन वेळ पाळत नसल्याचे समोर आले. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन जिल्हाधिकारी यांनी शो कॉज बजावण्याचे आदेश दिले. त्यानुसार निवासी उपजिल्हाधिकारी देशपांडे यांनी कर्मचार्यांना नोटीस बजावल्या आहेत.