शहरं
Join us  
Trending Stories
1
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
3
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
4
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
5
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
6
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
7
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
8
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
9
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
10
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
11
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
12
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
13
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
14
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
15
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
16
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
17
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
18
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
19
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
20
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...

धक्कादायक ! कौटुंबिक वादातून पित्यानेच दोन चिमुकल्यांची केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2018 5:00 PM

धुलीवंदनाच्या दिवशी पत्नीशी झालेल्या वादातून पतीने आपल्या चार वर्षाच्या मुलीसह दोन दीड वर्षाच्या चिमुकल्या मुलास गावालगतच्या विहीरीत फेकून देत त्यांची हत्या केल्याची खळबळजनक घटना बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील सुलतानपूर येथे शुक्रवारी दोन मार्च रोजी घडली.

बुलडाणा : धुलीवंदनाच्या दिवशी पत्नीशी झालेल्या वादातून पतीने आपल्या चार वर्षाच्या मुलीसह दोन दीड वर्षाच्या चिमुकल्या मुलास गावालगतच्या विहीरीत फेकून देत त्यांची हत्या केल्याची खळबळजनक घटना बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील सुलतानपूर येथे शुक्रवारी दोन मार्च रोजी घडली.या घटनेत आकांक्षा विष्णू बडगे (वय चार),  सोहम विष्णू बडगे (वय दीड वर्षे) या दोन चिमुकल्या मुलांचा करून अंत झाला. दरम्यान, मेहकर पोलिसांनी या प्रकरणी मृत मुलांचे वडील विष्णू बडगे (वय २७) यास अटक केली. सुलतानपूर येथील विष्णू बडगे याचा पत्नी संगिता हीच्याशी शुक्रवारी दोन मार्च रोजी सकाळी किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्यामुळे रागाच्या भरात त्याने त्याने  चार वर्षाची मुलगी आकांक्षा विष्णू बडगे आणि सोहम विष्णू बगडे (दीड वर्षे) यांना सोबत घेऊन सुलतानपूर कॅनाल रोडवर असलेल्याशिवशंकर भानापुरे यांची विहीर गाठून त्यात आपल्या दोन्ही चिमुकल्यांना फेकून दिले. त्यात दोन्ही मुलांचा मृत्यू झाला. दरम्यान, त्या नंतर लगोलग त्याने पुन्हा सुलतानपूर गाव गाठून आपण आपल्या दोन्ही मुलांना विहीरीत फेकून जीवे मारल्याची माहिती त्याने ग्रामस्थांना दिली, असे मेहकर पोलिसांनी सांगितले. त्यामुळे ग्रामस्थांनी लगोलग सुलतानपूरपासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या कॅनॉल रोडवरील विहीरीवर धाव घेतली. मात्र तोवरून विहीरीच्या पाण्यात बुडून दोन्ही चिमुकले मृत झाले होते. त्यानंतर ग्रामस्थांनी विहीरीतून दोन्ही मृत मुलांचे पार्थिव बाहेर काढले. उत्तरिय तपासणीसाठी त्यांचे पार्थिव मेहकर येतील रुग्णालयात हलविण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच मेहकर पोलिसांचा ताफा लगोलगल मेहकर शहरापासून सुमारे २० ते २२ किलोमीटर अंतरावर असलेल्या सुलतानपूर येथील कॅनॉल रोडवरील शिवार गाठले आणि ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही मृत मुलांना बाहेर काढले. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झालेली आहे. सोबतच या नराधम बापाला ग्रामस्थांच्या तोंडातून शिव्यांची वाखोली वाहल्या जात आहे.

विष्णू बडगेस अटकघटनेचे गांभिर्य पाहता मेहकर पोलिसांनी लगोलग विष्णू काशीराम बडगे यास अटक केली आहे. मोलमजुरी प्रसंगी बांधकामावर काम करून किंवा दुकानावर काम करून विष्णू बडगे हा कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. मात्र दोन मार्च रोजी कौटुंबिक वादातून त्याने दोनही पोटच्या गोळ््यांना विहीरीत फेकून जिवे मारले. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये त्याचाविषायी तीव्र संताप व्यक्त होत आहे. सध्या तो मेहकर पोलिसांच्या ताब्यात आहे.

- या घटनेत आकांक्षा विष्णू बडगे आणि सोहम विष्णू बडगे या दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे. आरोपी विष्णू बडगे यास ताब्यात घेण्यात आले आहे. ही घटना नेमक्या कोणत्या कारणामुळे झाली हे अद्याप सांगता येणार नाही. त्या दृष्टीने आमचा तपास चालू आहे. - जी. एस. पाबळे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक, मेहकर पोलिस ठाणे

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrimeगुन्हा