खामगांव : रेखा प्लॉट भागातील घराला रात्री १.३० च्या सुमारास अनोळखी व्यक्तीनी घराला पेटवुन दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्राप्त माहितीनुसार रेखा प्लॉट भागातील रहिवासी तुषार तुकाराम वखरे रात्री घरात आपल्या परिवारसह झोपले होते.अनोळखी व्यक्तीनी बाहेरून दरवाजाची कळी बाहेरून लावून पेट्रोल टाकून घराला आग लावून पेटवून दिले. तुषार वखरे यांनी मागच्या दरवाजाने बाहेर पडून सदर आग विझवली. त्यानंतर रात्री शिवाजी नगर पोलिसांना पाचारण करण्यात आले. घरामधे पत्नी सह मुलगा अनुज (१२), मुलगी अनुष्का (१०) हे दोन चिमुकले घरात होते. या आगीत बाथरुम व घराचा दरवाजा तसेच पलंग, गादी जळले आहे. तुषार वखरे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.
धक्कादायक....खामगावात घरात झोपलेल्या कुटुंबास पेटवून देण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 13:51 IST
खामगांव : रेखा प्लॅट भागातील घराला रात्री १.३० च्या सुमारास अनोळखी व्यक्तीनी घराला पेटवुन दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
धक्कादायक....खामगावात घरात झोपलेल्या कुटुंबास पेटवून देण्याचा प्रयत्न
ठळक मुद्देरेखा प्लॉट भागातील रहिवासी तुषार तुकाराम वखरे रात्री घरात आपल्या परिवारसह झोपले होते.अनोळखी व्यक्तीनी बाहेरून दरवाजाची कळी बाहेरून लावून पेट्रोल टाकून घराला आग लावून पेटवून दिले.तुषार वखरे यांनी मागच्या दरवाजाने बाहेर पडून सदर आग विझवली.