शॉक लागून बालकाचा मृत्यू

By Admin | Updated: April 15, 2015 01:02 IST2015-04-15T01:02:43+5:302015-04-15T01:02:43+5:30

खामगाव येथील घटना; अर्थिंंग वायरमध्ये विद्युत प्रवाह शिरल्याने विद्यूत अपघात.

Shock death of the child | शॉक लागून बालकाचा मृत्यू

शॉक लागून बालकाचा मृत्यू

खामगाव (जि. बुलडाणा ) : विद्युत शॉक लागून एका ६ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी ११ वा. मांडका येथे घडली. या घटनमुळे मांडका गावात एकच खळबळ उडाली आहे. सुमित संजय सातव हा सकाळी घराच्या अंगणात खेळत असताना घरामधून अर्थिंंग वायरमध्ये विद्युत प्रवाह शिरल्याने त्याला शॉक लागला. यामध्ये सुमित हा जागेवरच बेशुद्ध झाल्याने त्याला नातेवाइकांनी तातडीने येथील सामान्य रुग्णालयात उपचारार्थ भरती केले. दरम्यान, वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्याची तपासणी करून त्यास मृत घोषित केले. या प्रकरणी शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणामुळे मांडका गावात शोककळा पसरली आहे.

Web Title: Shock death of the child