शिवसेनेचे तीन उमेदवार घोषित
By Admin | Updated: September 26, 2014 00:15 IST2014-09-26T00:15:19+5:302014-09-26T00:15:19+5:30
तोताराम कायंदे यांचा अपेक्षा भंग

शिवसेनेचे तीन उमेदवार घोषित
बुलडाणा : जिल्ह्यातील शिवसेनेच्या तीन उमेदवारांची आज रात्री घोषणा करण्यात आली. बुलडाणा मतदार संघातून विद्यमान आ. विजयराज शिंदे, मेहकरमधून आ. डॉ.संजय रायमुलकर तर सिंदखेडराजातून डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आल्याची माहिती सेना कार्यालयातून देण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशान्वये तथा संपर्क प्रमुख खा. प्रतापराव जाधव यांच्या सुचनेनुसार शिवसेनेच्या कार्यालयातून ही माहिती दिल्यामुळे राष्ट्रवादीमधून शिवसेनेत दाखल झालेले तोताराम कायंदे यांना सिंदखेडराजामधून उमेदवारी मिळण्याचे संकेत होते; मात्र त्यांचा डावलल्याचे स्पष्ट झाले आहे.