शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

मेंढळी शिवारातील खून प्रकरण; 'त्या' आरोपीस पाच दिवसांची पोलिस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 00:16 IST

नांदुरा तालुक्यातील मेंढळी येथील अमोल झांबेर या युवकाच्या खून प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीला नांदुरा न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. गुरूवारी बोराखेडी पोलिसांनी त्याला नांदुरा न्यायालयात हजर केले होते.   

ठळक मुद्देअमोल मधुकर झांबरे याचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळला होतापोलिसांनी आरोपी सोपान कोल्हे यास गजाआड केले होते

लोकमत न्यूज नेटवर्कमोताळा : नांदुरा तालुक्यातील मेंढळी येथील अमोल झांबेर या युवकाच्या खून प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीला नांदुरा न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. गुरूवारी बोराखेडी पोलिसांनी त्याला नांदुरा न्यायालयात हजर केले होते.    अमोल मधुकर झांबरे याचा मंगळवारी २८ नोव्हेंबर रोजी मेंढळी शिवारात जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. दरम्यान, मृतकाचा भाऊ शरद मधुकर झांबरे याने बुधवारी बोराखेडी पोलिसांत तक्रार दिली होती. अमोल झांबरे याचे गावातीलच सोपान भिकाजी कोल्हे (४६) यांच्या मुलीसोबत गेल्या दोन वर्षांपासून प्रेम संबंध होते. परंतू सोपान कोल्हे यांना ते मान्य नव्हते. त्यामुळे सोपान कोल्हे यांनी संगनमताने अमोल झांबरे यास जाळून ठार मारल्याचे तक्रारीत नमूद केले होते. त्यावरून बोराखेडी पोलिसांनी आरोपी सोपान भिकाजी कोल्हे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यास गजाआड केले. गुरुवारी त्याला नांदुरा न्यायालयासमोर हजर केले असता, चार डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास ठाणेदार अविनाश भामरे, पीएसआय कडे खाँ पठाण यांच्या मार्गदर्शनात पोलिस हेडकॉन्स्टेबल रामदास वाढे करीत आहेत.

टॅग्स :buldhana gramin police stationबुलढाणा ग्रामीण पोलिस ठाणेCrimeगुन्हा