शिवाजी व्यायाम शाळा प्रकरण; एलसीबीकडून पालिकेची झाडाझडती

By Admin | Updated: May 2, 2017 19:19 IST2017-05-02T19:19:06+5:302017-05-02T19:19:06+5:30

खामगाव: शहरातील एका व्यायाम शाळेच्या दुरूपयोगप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागासोबतच स्थानिक पोलिसांच्यावतीने मंगळवारी सायंकाळी खामगाव पालिकेत चौकशी करण्यात आली.

Shivaji Exercise School Case; Due to LCB | शिवाजी व्यायाम शाळा प्रकरण; एलसीबीकडून पालिकेची झाडाझडती

शिवाजी व्यायाम शाळा प्रकरण; एलसीबीकडून पालिकेची झाडाझडती

खामगाव: शहरातील एका व्यायाम शाळेच्या दुरूपयोगप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागासोबतच स्थानिक पोलिसांच्यावतीने मंगळवारी सायंकाळी खामगाव पालिकेत चौकशी करण्यात आली. मुख्याधिकारी रजेवर असल्याने, उपस्थित कर्मचाऱ्यांनी एलसीबी आणि स्थानिक पोलिसांना अपेक्षीत सहकार्य केले नसल्याचे समजते.
खामगाव नगर पालिकेने २८ फेब्रुवारी रोजी झालेल्या सभेत शिवाजी व्यायाम मंदिराच्या दुरूपयोग केल्याचा ठपका ठेवत, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा आणि शिवाजी व्यायाम मंदिराचे अध्यक्ष गोकुलचंद सानंदा यांच्या विरोधात ठराव पारीत केला आहे. या ठरावानुसार गुन्हा दाखल होण्याच्या आशंकेने माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी गेल्या गुरूवारी खामगाव न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळविला आहे. तथापि, गुन्हा दाखल नसतानाही सानंदांनी ४ मे पर्यंत जामीन मिळविल्याने, याप्रकरणी पालिका प्रशासनाची बाजू ऐकून घेण्यासाठी शिवाजी नगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक संतोष ताले यांनी पालिकेत धडक दिली. त्याचप्रमाणे याच प्रकरणाच्या चौकशीसाठी एलसीबीचे निरिक्षक शिकरे यांनीही पालिकेत धडक दिल्याने, पालिकेत उपस्थित कर्मचाऱ्यांची चांगलीच धावाधाव झाली.

मुख्याधिकाऱ्यांची अनुपस्थिती, कर्मचाऱ्यांचे कानावर हात!
खामगाव नगर पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत रोडे ७ मेपर्यंत दीर्घ रजेवर गेले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवाजी व्यायाम शाळा प्रकरणी चौकशीसाठी पालिकेत दाखल झालेल्या एलसीबी निरिक्षकांसह, शिवाजी नगर पोलिस स्टेशनच्या निरिक्षकांना रिकाम्या हाताने परतावे लागल्याची चर्चा आहे. मुख्याधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत कर्मचाऱ्यांनी कानावर हात ठेवल्याची चर्चा पालिका वर्तुळात होती.

Web Title: Shivaji Exercise School Case; Due to LCB

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.