शिवाजी महाविद्यालयात रा. दे. भोंडे सरकार यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:40 IST2021-08-20T04:40:26+5:302021-08-20T04:40:26+5:30
कार्यक्रमाला श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे आजीवन सदस्य ॲड. बाबासाहेब भोंडे, यशवंत भोंडे, प्रा.ए.के.वाघ, प्रा.डी.एम.कानडजे, शाळा निरीक्षक माळोदे, संस्थेचे स्वीकृत ...

शिवाजी महाविद्यालयात रा. दे. भोंडे सरकार यांना अभिवादन
कार्यक्रमाला श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे आजीवन सदस्य ॲड. बाबासाहेब भोंडे, यशवंत भोंडे, प्रा.ए.के.वाघ, प्रा.डी.एम.कानडजे, शाळा निरीक्षक माळोदे, संस्थेचे स्वीकृत सदस्य प्राचार्य डॉ.पी.एस.वायाळ, माजी प्राचार्य डॉ. अनिल गारोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ओमराज देशमुख होते. प्रसंगी प्रमुख वक्ते प्राचार्य डॉ. वायाळ व डॉ. गारोडे यांनी रा. दे. भोंडे सरकार यांच्या राजकीय, सामाजिक, सहकार व शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरीवर प्रकाश टाकला. प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. डॉ. जे. जे. जाधव यांनी केले. आभार प्रा. डॉ. व्ही. आर.पडवाल यांनी मानले. कार्यक्रमाला प्राचार्य नंदू गायकवाड, मुख्याध्यापिका जेऊघाले यांच्यासह शिवाजी महाविद्यालय व शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी राजेंद्र करपे, विश्वनाथ सावळे, रामदास भोंडे, संजय घांगुर्डे, उत्तमराव कानडजे यांनी परिश्रम घेतले.