माॅडेल डिग्री काॅलेज येथे शिवजयंती उत्साहात साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:39 IST2021-02-20T05:39:13+5:302021-02-20T05:39:13+5:30

बुलडाणा : माॅडेल डिग्री काॅलेज, बुलडाणा येथे १९ फेब्रुवारी राेजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. या ...

Shiva Jayanti celebrations at Model Degree College | माॅडेल डिग्री काॅलेज येथे शिवजयंती उत्साहात साजरी

माॅडेल डिग्री काॅलेज येथे शिवजयंती उत्साहात साजरी

बुलडाणा : माॅडेल डिग्री काॅलेज, बुलडाणा येथे १९ फेब्रुवारी राेजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. विवेक वावगे हाेते तर मुख्य मार्गदर्शक म्हणून प्रा. किशाेर बुलकडे उपस्थित हाेते. यावेळी प्रथम संत गाडगेबाबा व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रा. किशाेर बुलकडे, प्रा. चंद्रशेखर भांदककर यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाॅ. पी. व्ही. पाटील यांनी केले तर प्रा. साेनुने यांनी आभार मानले. यावेळी प्रा. माेरे, प्रा. पारवे, प्रा. काळे, प्रा. गर्जे, प्रा. निंबानी, प्रा. इंगळे, प्रा. विनकर, प्रा. वडाळकर, डाॅ. व्यवहारे, प्रा. सादतकर उपस्थित हाेते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंगेश जाेशी, रूपाली गुडदे यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Shiva Jayanti celebrations at Model Degree College