कर्जमुक्तीसाठी शिवसेनेचे उपोषण
By Admin | Updated: April 14, 2017 00:22 IST2017-04-14T00:22:47+5:302017-04-14T00:22:47+5:30
बुलडाणा : शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करावी, या मुख्य मागणीसाठी १३ एप्रिल रोजी शिवसेनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले.

कर्जमुक्तीसाठी शिवसेनेचे उपोषण
बुलडाणा : शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करावी, या मुख्य मागणीसाठी आज, १३ एप्रिल रोजी शिवसेनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. आपल्या विविध मागण्यांबाबत शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
शेतकऱ्यांपुढे कधी अस्मानी संकट तर कधी शासनाच्या सुलतानी धोरणामुळे अडचणींचा डोंगर उभा राहतोय. गत तीन वर्षांपासून कधी गारपीट व अतिवृष्टी झाली. यंदा चांगला पाऊस पडून विक्रमी उत्पादन घेतल्यावर नोटाबंदीच्या निर्णयामुळे शेतमालाचे भाव पडल्याने शेतकऱ्यांची आर्थिक विवंचना वाढली. त्यामुळे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करून शेतकऱ्यांचा सात-बारा कोणतेही निकष न लावता संपूर्ण कोरा करावा व स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी तत्काळ लागू कराव्यात, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख जालींधर बुधवत यांनी केली. यावेळी संजय गायकवाड, आशिष जाधव, उमेश कापुरे, दीपक सोनुने, अशोक इंगळे, लखन गाडेकर यांनीही मार्गदर्शन केले. या उपोषणास न.पा.उपाध्यक्ष विजय जायभाये, महिला आघाडीच्या सिंधुताई खेडेकर, पं.स.सदस्य राजू पवार, दिलीप सिनकर, नंदु कऱ्हाळे, भोजराज पाटील, शरद टेकाळे, माणिकराव सावळे, मधुकर महाले, वसंतराव डुकरे, विजय डुकरे, सुमत इंगळे, विजय इतवारे, शेषराव सावळे, ज्ञानेश्वर गुळवे, मधुकर सिनकर, विजय गाढे, दिलीप माळोदे, सीताराम जगताप यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.