महिला कुस्तीमधील श्रावणीचे अभूतपूर्व यशाबद्दल शिवसेने तर्फे सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 20:01 IST2017-10-04T19:52:45+5:302017-10-04T20:01:30+5:30

बुलढाणा - स्थानिक भारत विद्यालयाची ९ वीची विद्यार्थिनी श्रावणी संजय मोटे हिने अमरावती येथे आयोजित महिला कुस्ती १७ वर्षीय वयोगटातून ६५ किलो वजन गटातून विभागातून प्रथम क्रमांक पटकावून राज्यस्तरावर मजल मारली आहे.

Shiv Sena felicitated about the unprecedented achievement of Shravani in women wrestling | महिला कुस्तीमधील श्रावणीचे अभूतपूर्व यशाबद्दल शिवसेने तर्फे सत्कार

महिला कुस्तीमधील श्रावणीचे अभूतपूर्व यशाबद्दल शिवसेने तर्फे सत्कार

ठळक मुद्देश्रावणी स्थानिक भारत विद्यालयाची ९ वीची विद्यार्थिनी विभागातून प्रथम क्रमांक पटकावून राज्यस्तरावर मारली मजल 

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलढाणा - स्थानिक भारत विद्यालयाची ९ वीची विद्यार्थिनी श्रावणी संजय मोटे हिने अमरावती येथे आयोजित महिला कुस्ती १७ वर्षीय वयोगटातून ६५ किलो वजन गटातून विभागातून प्रथम क्रमांक पटकावून राज्यस्तरावर मजल मारली आहे.
बुलढाणा व विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. याबद्दल शिवसेनेच्या बुलढाणा येथील राजे गार्डन येथे झालेल्या मेळाव्यात शिवसेना माजी आमदार वियजराज शिंदे शिववाहतूक सेनेचे जिल्हा प्रमुख संजय हाडेसह अन्य मान्यवरानी श्रावणीचा सत्कार करुन पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. श्रावणीने यासाठी तिला शाळेचे मुख्याध्यापक एस. आर. उन्हाळे, उपमुख्याध्यापक राम पालवे, क्रीडा शिक्षक गर्गे व सहकारी शिक्षकांनी व श्रावणीचे वडिल संजय मोटे यांनी क्रीडा प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन केले

Web Title: Shiv Sena felicitated about the unprecedented achievement of Shravani in women wrestling