शिवसेनेतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:22 IST2021-02-22T04:22:45+5:302021-02-22T04:22:45+5:30

सर्वप्रथम खा.प्रतापराव जाधव व आ.डॉ.संजय रायमुलकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार अर्पण करण्यात आले. यावेळी आ.संजय ...

Shiv Sena celebrates Shiv Jayanti with enthusiasm | शिवसेनेतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी

शिवसेनेतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी

सर्वप्रथम खा.प्रतापराव जाधव व आ.डॉ.संजय रायमुलकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार अर्पण करण्यात आले. यावेळी आ.संजय रायमुलकर, सेना तालुका प्रमुख सुरेश वाळूकर, न.प.गट नेता संजय जाधव, पाणीपुरवठा सभापती दीपिका रहाटे, शिक्षण सभापती शारदा सास्ते, आरोग्य सभापती हलीमा बी. गवळी, नियोजन सभापती तौफीक कुरैशी, ओम सौभागे, संगीता रींढे, मीरा तायडे, कमलाबाई लश्कर, मनोज जाधव, रामेश्वर भिसे, पिंटू सुर्जन, विकास जोशी, अक्काबाई गायकवाड आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवसेना शहर प्रमुख व न.प.उपाध्यक्ष जयचंद बाठिया यांनी केले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. यावेळी खा.प्रतापराव जाधव, आ.डॉ.संजय रायमुलकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन विलास तेजनकर यांनी केले. आभार विकास जोशी यांनी मानले.

Web Title: Shiv Sena celebrates Shiv Jayanti with enthusiasm