शिवजयंती : 'जय भवानी - जय शिवाजी' च्या जयघोषात निनादले मलकापूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 12:48 PM2020-02-19T12:48:09+5:302020-02-19T12:48:16+5:30

छत्रपती शिवाजी महाराज जयंती

Shiv Jayanti Celebrated in Malkapur | शिवजयंती : 'जय भवानी - जय शिवाजी' च्या जयघोषात निनादले मलकापूर

शिवजयंती : 'जय भवानी - जय शिवाजी' च्या जयघोषात निनादले मलकापूर

googlenewsNext

मलकापूरः विदर्भाच्या प्रवेशद्वारावर जय भवानी जय शिवाजी मलकापूर मोटारसायकल रँलीने अक्षरशः दणाणले.  सकाळपासूनच आज बुधवारी आई तुळजाभवानी फाऊंडेशनच्या नेतृत्वात आयोजित सोहळ्यास  शिवभक्तांनी उदंड प्रतिसाद दिला.
 दरवर्षी विदर्भाचे प्रवेशद्वारी मलकापूरात उभ्या महाराष्ट्राच दैवत मानल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या हर्ष उल्हासात साजरी केली जाते.  बुधवारी सकाळी शिवाजी नगर स्थित आई भवानीचे विधीवत पूजन आयोजित समितीचे अध्यक्ष विजयराव जाधव यांनी केले. ध्वजारोहण माजी आ.चैनसुख संचेती यांनी तर शहरातील एकमेव शिवपुतळ्यास विद्यमान आ.राजेश एकडे यांनी केले. त्यांच्यासमवेत रा.काँ जिल्हा उपाध्यक्ष संतोषराव रायपूरे नगराध्यक्ष अँड. हरीश रावळ, बाजार समितीचे मुख्य प्रशासक डॉ. अरविद कोलते,पालिका उपाध्यक्ष रशिदखा जमादार ,मा.नगराध्यक्ष दिलीपभाऊ देशमुख, समतेचे निळे वादळ संघटना अध्यक्ष भाई अशांत वानखेडे,डि.वाय.एस.पी . रूपाली ढाकणे,तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे, पोलीस निरीक्षक कैलास नागरे,जिल्हा नियोजन समिती सदस्य राजेंद्र वाडेकर आदीसह अनेकांनी शिवपुतळ्यास माल्यार्पण करत मानवंदना दिली.
सकाळी ९.३० वा.शहरातील तरूणांच्या मोटारसायकल रँलीस गो.वि.महाजन क्रीडांगणावरून सुरुवात झाली. बुलढाणा रस्त्यावरून हनुमान चौक,तहसील चौक,चारखंबा चौक,शिवाजी नगर,वल्ली चौक,दुर्गा नगर,गाडेगांव मोहल्ला,मार्गाने मोटारसायकल रँलीचा समारोप हनुमान चौकात करण्यात आला. 

 

Web Title: Shiv Jayanti Celebrated in Malkapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.