ऐतिहासिक मोती तलावात फडकला शिवध्वज!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:31 IST2021-07-26T04:31:25+5:302021-07-26T04:31:25+5:30
मोती तलाव शहराचे वैभव आहे. शिवकालीन स्थापत्य कलेचा उत्तम उदाहरण आणि पाणी व्यवस्थापन म्हणून याकडे पाहिले जाते. शहरात अनेक ...

ऐतिहासिक मोती तलावात फडकला शिवध्वज!
मोती तलाव शहराचे वैभव आहे. शिवकालीन स्थापत्य कलेचा उत्तम उदाहरण आणि पाणी व्यवस्थापन म्हणून याकडे पाहिले जाते. शहरात अनेक तलाव आहेत. परंतु चांदणी आणि मोती तलावाचे महत्त्व वेगळेच आहे. दरम्यान, या तलावात पोहण्यासाठी सकाळीच अनेक तरुण जातात. पाण्याने तुडुंब भरलेल्या तलावात मधोमध शिवध्वज डौलाने फडकला जावा, अशी कल्पना युवकांच्या मनात आली. दरम्यान, शुक्रवारी जवळपास पन्नास फूट उंचीचा शिवध्वज मधोमध असलेल्या बुरुजावर लावण्यात आला.
ध्वज उभारण्यासाठी युवकांचा पुढाकार
ध्वज उभारण्याच्या कामात विजय तायडे, ॲड. संदीप मेहेत्रे, गजानन मेहेत्रे, नामदेव खांडेभराड, कृष्णा अवचार संजय मेहेत्रे, शहाजी चौधरी, चंद्रकांत चौधरी, नंदू खांडेभराड, आकाश मेहेत्रे, रवी ढवळे, सुरज खांडेभराड, मंगेश खुरपे, दीपक माघाडे, किरण राजपूत, संघदीप म्हस्के, विकास जाधव, किरण मेहर या तरुणांचा सहभाग होता.