शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मलकापूरात प्रहार जनशक्तीपक्षाचे 'शिट्टी बजाव'आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 16:12 IST

प्रहार जनशक्ती पक्षाचेवतीने उपजिल्हाप्रमुख अजय टप, महिला आघाडीप्रमुख प्रांजली धोरण यांच्या नेतृत्वात आगळेवेगळे शिट्टी बजाव आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देप्रहार जनशक्ती पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अजय टप यांच्या हस्ते तहसील चौकातील देशगौरव सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले. पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी गळ्यात टाकलेल्या शिट्या वाजवत तहसील चौकातून नांदुरा रस्त्यावरुन नगरपालिके पर्यंत शिट्टी बजाव आंदोलन केले.

 

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : मलकापुरात विविध बँका, व्यापारी संकुले, सोसायट्या आदी ठिकाणच्या अनधिकृत पार्कींगमुळे रहदारीत खोडा निर्माण होत आहे. त्यामुळे अशा बांधकामांना परवानगी देणाऱ्या तत्कालीन मुख्याधिकारी व बांधकाम अभियंत्यांवर कारवाई करावी. या मागणीवरुन प्रहार जनशक्ती पक्षाचेवतीने उपजिल्हाप्रमुख अजय टप, महिला आघाडीप्रमुख प्रांजली धोरण यांच्या नेतृत्वात आगळेवेगळे शिट्टी बजाव आंदोलन करण्यात आले.आज शनिवारी दुपारी १२ वाजता प्रहार जनशक्ती पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अजय टप यांच्या हस्ते तहसील चौकातील देशगौरव सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी गळ्यात टाकलेल्या शिट्या वाजवत तहसील चौकातून नांदुरा रस्त्यावरुन नगरपालिके पर्यंत शिट्टी बजाव आंदोलन केले. या माध्यमातून पालिका प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न आंदोलनकर्त्यांनी केला.या आंदोलनात युवा तालुकाप्रमुख अमोल बावस्कार, शेषराव संबारे, शालीकराम पाटील, शहर युवाप्रमुख अर्जुन पाटील, राहुल तायडे, देविदास बोंबटकार, बळीराम बावस्कार, अजाबराव वाघ, प्रदीप पाटील, विशाल आमले, पप्पू ठाकूर, प्रमोद भिसे, ऋषिकेश निमकर्डे, सचिन बुडुकले, दीपक चंदनकार, सोपान इंगळे, वैभव राठोड, राजेंद्र निंबोळकर, नविन वाघ, विनोद बाठे, रोशनी कथणे आदींसह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते सामील होते. दरम्यान आंदोलनानंतर पालिका प्रशासनास निवेदन देवून अजूनही कारवाई न झाल्यास येणाºया काळात आंदोलन तीव्र करण्याबाबत इशारा देण्यात आला.

टॅग्स :Malkapurमलकापूरagitationआंदोलन