...तर महावितरणवर शिंगाडा मोर्चा!
By Admin | Updated: April 19, 2017 18:03 IST2017-04-19T18:03:16+5:302017-04-19T18:03:16+5:30
तीन वर्षांपासून कृषिपंप जोडणीचे अर्ज प्रलंबित.

...तर महावितरणवर शिंगाडा मोर्चा!
बुलडाणा : एक वर्षांपूर्वी लोकअदालतीत खासदार व अधिका-यांनी शेतात कृषिपंपासाठी वीज जोडणी देण्याचे आश्वासन दिले. मात्र, अजूनही वीज जोडणी मिळाली नसल्याने शेकडो शेतकरी त्रस्त आहेत. त्यामुळे एक महिन्याच्या आत वीजजोडणी दिली नाही तर महावितरणवर शिंगाडा मोर्चा काढू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
जिल्ह्यातील नाईक नगर व दाभा गावातील शेतकऱ्यांनी तीन वर्षांपूर्वी शेतात कृषिपंपाकरिता वीज जोडणीसाठी अर्ज दिले होते. त्यानंतर गतवर्षी झालेल्या लोक अदालतीत खासदार प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांनी अर्ज प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांना २०१६ - १७ साठी मोठ्या प्रमाणात निधी
उपलब्ध झाला असून, तत्काळ वीजजोडणी मिळेल, असे आश्वासन दिले होते. मात्र, त्याला एक वर्ष झाले तरी अद्याप वीजजोडणी मिळाली नाही. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. शेतात पाणी असल्यावरही केवळ वीजपुरवठा नसल्यामुळे फळबागांचे नुकसान होत आहे. परिणामी संतत्प झालेल्या शेतकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयावर शिंगाडा मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.