लोणार तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी शेख समद शेख अहमद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:38 IST2021-09-22T04:38:16+5:302021-09-22T04:38:16+5:30
शेख समद शेख अहमद मागील वीस वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून समाजकारण, राजकारणामध्ये विविध पदे भूषविली आहेत. त्यांची ...

लोणार तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी शेख समद शेख अहमद
शेख समद शेख अहमद मागील वीस वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून समाजकारण, राजकारणामध्ये विविध पदे भूषविली आहेत. त्यांची कामगिरी बघता लोणार तालुका पत्रकार संघाच्या वतीने सर्वानुमते शेख समद यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तसेच कार्याध्यक्षपदी प्रमोद वराडे, सचिवपदी पवन शर्मा, उपाध्यक्षपदी संदीप मापारी यांची निवड करण्यात आली. ज्येष्ठ पत्रकार तथा नगरसेवक डॉ. अनिल मापारी यांच्या मार्गदर्शनाखाली उमेश कुटे,शाम सोनुने यांच्या उपस्थित लोणार तालुका पत्रकार संघाची कार्यकारिणी करण्यात आली आहे. नवीन कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष शेख समद शेख अमहद, उपाध्यक्ष संदीप मापारी, सचिव पवन शर्मा कोषाध्यक्ष शाम सोनुने, सहसचिव नंदकुमार डव्हळे, सहकोषाध्यक्ष अशोक इंगळे, प्रसिद्धी प्रमुख अनिल वायाळ तर सदस्य उमेश कुटे, विठ्ठल घायाळ,रहेमान नवरंगाबादी, अविनाश शुक्ला, किशोर मापारी, राहुल सरदार, उमेश पटोकार, मयूर गोलेचा, सचिन गोलेचा, सुनील वर्मा, प्रणव वराडे, संतोष पुंड, शेख यासीन, किशोर मोरे, लक्ष्मण खरात सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते.या सभेचे संचालन गोपाल तोष्णीवाल यांनी ,प्रस्ताविक राहुल सरदार तर आभार रहेमान नवरंगाबादी यांनी मानले. (वा.प्र.)