प्रशासकीय मान्यतेत अडकला शेगावचा आठवडी बाजार

By Admin | Updated: January 28, 2015 23:36 IST2015-01-28T23:36:32+5:302015-01-28T23:36:32+5:30

शेगाव विकास आराखड्यात समावेश; जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे प्रशासकीय मान्यता अद्दाप नाही.

Shegaon's Weekly Market | प्रशासकीय मान्यतेत अडकला शेगावचा आठवडी बाजार

प्रशासकीय मान्यतेत अडकला शेगावचा आठवडी बाजार

फहीम देशमुख / शेगाव (बुलडाणा):
शेगाव विकास आराखड्याअंतर्गत मंजुरात मिळालेल्या आठवडी बाजाराचा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात रखडला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
शेगाव शहराचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शासनाने ५00 कोटी रूपयांचा विकास आराखडा मंजूर केला आहे. यामध्ये शहरातील रस्ते, नाल्या, भुमिगत गटारी, प्रशासकीय कार्यालय, पोलिस ठाणे आदींचा समावेश आहे. यासोबत इतर भागाचाही विकास व्हावा यासाठी शासनाने शहरातील आठवडी बाजाराच्या विकासासाठी नगर पालिकेला परवानगी दिली आहे. मात्र यासाठी हा खर्च बांधा, वापरा आणि हस्तांतरत करा या धोरणांवर असल्याने यावर खर्च अपेक्षीत नाही.
न.प.चे आर्थिक उत्पन्न वाढावे यासाठी नगर पालिकेने सदर आठवडी बाजारात ७ कोटी रूपयांचे दुकाने, बाजार ओटे, मटन मार्केट, मच्छी मार्केट, कार पार्कींग, शौचालय, रस्ते, नाल्या आणि लाईट इत्यादी न.प.च्या विविध फंडातून तयार करून देण्याचा निर्णय २0 जून २0१४ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत ठराव क्र.३ नुसार मान्यता देण्यात आली. व तशा प्रकारचे प्रस्ताव तज्ञांकडून तयार करून शासनाच्या सर्व अटी शर्तीनुसार आराखडा तयार करून जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासकीय मंजुरातीसाठी ६ ऑगस्ट २0१४ रोजी सादर केले. मात्र विकास आराखड्यातील इतर कामाप्रमाणे या कामालाही दप्तर दिरंगाईचा फटका बसलेला दिसत आहे.
सदर प्रस्तावाची फाईल जिल्हा अधिकारी कार्यालयातील सामान्ये प्रशासन विभागाकडे धुळखात पडून आहे. एकीकडे विकास आराखड्यातील कामांना गती देण्यासाठी जिल्हाधिकारी किरण कुरूंदकर हे सदैव प्रयत्नरत राहतात. त्यामुळे त्यांनी या परिपुर्ण प्रस्तावाला मान्यता बहाल केल्यास शहराच्या मध्यवर्ती असलेला आठवडी बाजाराचा विकास शक्य होईल. यासंदर्भात शेगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी टी. जी. मुल्लाणी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आठवडी बाजाराचा परिपूर्ण प्रस्ताव नगर प्रशासन विभागाकडे सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावासंदर्भात पालिकेकडून पाठपुरावा सुरू असून प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर तत्काळ कार्यवाही सुरू करण्यात येणार असल्याचे सांगीतले.

Web Title: Shegaon's Weekly Market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.