शेगाव नगर विकास आघाडी काँग्रेसमध्ये विलीन
By Admin | Updated: March 12, 2015 01:54 IST2015-03-12T01:54:13+5:302015-03-12T01:54:13+5:30
बुलडाण्यात प्रवेश सोहळा : काँग्रेसच्या चार सदस्यांनी मांडली वेगळी चूल

शेगाव नगर विकास आघाडी काँग्रेसमध्ये विलीन
बुलडाणा : शेगावचे नगराध्यक्ष प्रमोद उपाख्य बंडुबाप्पू देशमुख यांच्या निधनानंतर राजकीय घडामोडी अधिक वेगवान झाल्या आहेत. शेगाव येथील नगर विकास आघाडीच्या सहा सदस्यांनी काँग्रेस पक्षात रीतसर प्रवेश केल्याने काँग्रेसची ताकद वाढली आहे. बुलडाणा येथे बुधवारी दुपारी जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात प्रवेश सोहळा होत असताना काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेल्या चार सदस्यांनी स्वतंत्र ह्यबह्ण गट स्थापन करण्याचे पत्र जिल्हाधिकार्यांना सोपविल्यामुळे पालिकेच्या राजकारणात आणखी वादळ निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
बंडुबाप्पू देशमुख यांचे ६ मार्च रोजी निधन झाल्याने नगराध्यक्षाच्या रिक्त पदासाठी राजकीय फिल्डिंग लावण्यास सुरुवात झाली. स्व. देशमुख यांच्या नियोजित काळ हा सव्वा वर्षाचा होता व यानंतर नगराध्यक्षपद हे तडजोडीच्या राजकारणातुन भाजपकडे जाणार होते. या पृष्ठभूमीवर बुधवारी सहा सदस्य संख्या असलेल्या नगर विकास आघाडीने शहराचा विकासाला गती देण्याच्या मुद्यावर आपली आघाडी काँग्रेसमध्ये विलीन केली आहे.