शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शेगाव नगर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यास लाच घेताना पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 12:14 IST

शेगाव: निवासी असलेल्या प्लॉटची वाणिज्य विषयक नोंद करण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या शेगाव मुख्याधिकाऱ्यांसह रोखपालास पकडण्यात आले. ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शनिवारी सकाळी ९ वाजता केली.

लोकमत न्यूज नेटवर्क

शेगाव: निवासी असलेल्या प्लॉटची वाणिज्य विषयक नोंद करण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या शेगाव नगर पालिका  मुख्याधिकारी अतुल पंत आणि रोखपाल आर.पी.इंगळे पकडण्यात आले. ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शनिवारी सकाळी ९ वाजता केली. या कारवाईमुळे शेगावसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शहरातील एका निवासी प्लॉटची वाणिज्य विषयक  नोंद करण्यासाठी दस्तवेज पालिकेत सादर करण्यात आले. दरम्यान, या प्लॉटची वाणिज्य विषयक नोंद करण्यासाठी ५ लाख रुपयांच्या लाचेची मागणी रोखपालाच्या मध्यस्थीने मुख्याधिकाऱ्यांनी केली. त्यानंतर याप्रकरणी संबधितांनी याबाबत लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीच्या अनुषंगाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने  शेगाव पालिकेचे रोखपाल आर.पी. इंगळे यांच्या घरी धडक दिली. त्याचवेळी या पथकातील काही कर्मचारी मुख्याधिकाऱ्यांच्या घरी धडकले.  दरम्यानच्या काळात रोखपाल आणि मुख्याधिकाºयांचे संभाषण झाले. मुख्याधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून एक लाख २० हजाराची रक्कम स्वीकारताना  रोखपाल आर.पी. इंगळे यांना ताब्यात घेण्यात आले. त्याचवेळी दुसऱ्या पथकाने मुख्याधिकाऱ्यांनाही ताब्यात घेतले. निवासी प्लॉटची वाणिज्यविषयक नोंद करण्यासाठी सुरूवातीला पाच लक्ष रुपयांची मागणी करण्यात आली. मात्र, शेवटी एक लाख २० हजार रुपयांवर तडजोड ठरली होती. याप्रकरणी मुख्याधिकारी अतुल पंत आणि रोखपाल आर.पी.इंगळे यांची कसून चौकशी सुरू असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सांगितले. या घटनेची वार्ता वाऱ्यासारखी पसरली असून, शेगाव पालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. (शहर प्रतिनिधी)

टॅग्स :ShegaonशेगावCrime Newsगुन्हेगारीAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग