शेगाव नगर पालिकेला २.५ कोटींचे उत्पन्न

By Admin | Updated: November 29, 2014 22:51 IST2014-11-29T22:51:46+5:302014-11-29T22:51:46+5:30

खुल्या भूखंडाला ४00 रुपये आकारणी : तंतोतंत मोजणी झाल्याने करात वाढ.

Shegaon municipal corporation earns 2.5 crores | शेगाव नगर पालिकेला २.५ कोटींचे उत्पन्न

शेगाव नगर पालिकेला २.५ कोटींचे उत्पन्न

फहीम आर. देशमुख /शेगाव (बुलडाणा)
दर पाच वर्षानंतर मालमत्ता व इतर करांमध्ये वाढ करण्याच्या नियमांतर्गत शेगाव नगरपालिकेने मालमत्ता करामध्ये दहा टक्क्याने वाढ केल्यानंतर न.प.चे उत्पन्न एक कोटी दहा लाख रुपयांवरून अडीच कोटी रुपये झाले आहे. करवाढ २00 टक्के झाल्याची ओरड नागरिकांकडून होत आहे.
२00९ साली मालमत्ता कर, वृक्षकर, शिक्षणकर व इतर करांमध्ये वाढ झाल्यानंतर आता पाच वर्षाने नगरपालिकेने करात वाढ करण्याचा निर्णय घेतलेला असून, यामध्ये दहा टक्के कर वाढविला आहे.; मात्र यावेळेस उपलब्ध असलेल्या मालमत्ता व इमारतींची खासगी कंपनीकडून तंतोतंत मोजणी केल्यानंतर आता खर्‍या मोजमापानुसार कर निर्धारित केल्याने मागील कर व आताच्या करामध्ये दिसणार्‍या मोठय़ा तफावतीमुळे नागरिकांमध्ये गोंधळ उडाला आहे. नगरपालिकेने शेगाव शहराचे चार झोनमध्ये विभागणी केली असून, या झोननुसार दर आकारण्यात आले आहेत.
या शिवाय पक्के बांधकाम, कच्चे बांधकाम, टिन व कौलाचे घर, यांचे कर वेगवेगळय़ा पद्धतीने निर्धारित केलेले आहे. याशिवाय शहरातील हद्दीतील खुल्या भूखंडांना वार्षिक ४00 रुपये प्रती १ हजार चौरस फुटाप्रमाणे कर निर्धारित करण्यात आले आहेत. या कामी नगरपालिकेने एका खासगी कंपनीला काम दिले होते.
या कंपनीने प्रत्येक घराची मोजणी व सर्व्हेक्षण केल्यानंतर याशिवाय मोजणी करताना छायाचित्रे गोळा करून ज्या झोनमध्ये ही मालमत्ता मोडत असेल त्यानुसार कर आकारणी प्रस्तावित केली.
ही प्रक्रिया पार पडल्यानंतर नगरपालिकेने शहरातील सर्व मालमत्ताधारकांना नोटिसेस बजावून नव्या करासंबंधात अवगत केले आहे. तसेच ज्या नागरिकांना कर जास्त आकारला असे वाटत असल्यास ८ डिसेंबर २0१४ पर्यंत हरकती दाखल करण्याची मुदत देण्यात आली असून, या मुदतीवर अमरावती येथील नगर रचनाकार विभागातील प्राधिकृत अधिकारी या हरकतींवर सुनावणी करणार आहेत.

Web Title: Shegaon municipal corporation earns 2.5 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.