शेगावचे सहा नगरसेवक ठरले पात्र

By Admin | Updated: July 26, 2016 01:54 IST2016-07-26T01:54:38+5:302016-07-26T01:54:38+5:30

उच्च न्यायालयाचा निर्णय; नियम पाळले नाही म्हणून जिल्हाधिकारी यांच्या निर्णयावर ताशेरे.

Shegaon has been named as a corporator | शेगावचे सहा नगरसेवक ठरले पात्र

शेगावचे सहा नगरसेवक ठरले पात्र

शेगाव (जि. बुलडाणा): काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष शैलेंद्र पाटील यांच्यासह ६ नगरसेवकांच्या विरोधात जिल्हाधिकारी बुलडाणा यांनी दिलेला निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अवैध ठरवित सहाही नगरसेवक पात्र असल्याचा निकाल सोमवारी दिला. शिवाय निकाल देताना नियम पाळले नाही म्हणून जिल्हाधिकारी यांच्या निर्णयावर ताशेरे ओढत सदर प्रकरण पुनर्निर्णयासाठी बुलडाणा येथे पाठविले आहे. यामुळे शेगावच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. पक्षादेश नाकारून पक्ष आदेशाविरुद्ध मतदान केल्याच्या प्रकरणानंतर काँग्रेसचे गटनेते शिवाजी बुरुंगले यांनी नगराध्यक्ष शारदा कलोरे यांच्यासह चार नगरसेवकांविरुद्ध जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्याकडे अपात्रतेसाठी प्रकरण दाखल केले होते व त्यानंतर दुसर्‍या गटातून शारदा कलोरे यांनी आघाडीमधून काँग्रेसमध्ये प्रवेश घेतलेल्या नगरसेवक शैलेंद्र पाटील यांच्यासह सहा नगरसेवकांना अपात्र ठरविण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रकरण दाखल केले होते. यावर सहा नगरसेवकांना जिल्हाधिकारी बुलडाणा यांनी अपात्र घोषित केल्यानंतर शैलेंद्र पाटील यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. या प्रकरणावर नागपूर खंडपीठात न्यायमूर्ती झेड.ए. हक यांनी निकाल देत जिल्हाधिकारी बुलडाणा यांनी दिलेला निकाल रद्द ठरवित त्या सहाही नगरसेवकांना पात्र ठरविले आहे तर उलटपक्षी जिल्हाधिकारी बुलडाणा यांनी दिलेला निकाल हा प्रकरणाशी संबंधित नसल्याचे लक्षात आल्यावरून सदर प्रकरण पुनर्निर्णयासाठी जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्याकडे परत पाठविले आहे. शैलेंद्र पाटील यांच्याकडून अँड. प्रदीप क्षीरसागर, अँड. अजय घारे, अँड. संदीप चोपडे यांनी तर नगराध्यक्ष कलोरे यांच्याकडून अँड. भंडारकर यांनी काम पाहिले.

Web Title: Shegaon has been named as a corporator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.