शेगाव पालिकेला मिळाला दोन कोटींचा निधी
By Admin | Updated: July 31, 2014 01:29 IST2014-07-31T00:59:50+5:302014-07-31T01:29:24+5:30
चालु वर्षात दलीतवस्ती निधीचे २ कोटी रूपयांचे प्रस्ताव दाखल करण्याच्या जिल्हाधिकारी यांच्या सुचना.

शेगाव पालिकेला मिळाला दोन कोटींचा निधी
बुलडाणा : जिल्हाधिकारी यांनी बोलाविलेल्या नगर परिषद दलित वस्ती निधीबाबत चर्चा करणे व प्रस्ताव मंजुर करणेसाठी बैठकीत शेगाव न.प.ला २0 मार्च २0१४ च्या दलीत वस्ती निधीतून १ कोटी ९२ लक्ष रूपये मंजुर करण्यात आले. सन २0१५ या चालु वर्षात दलीतवस्ती निधीचे २ कोटी रूपयाचे प्रस्ताव आठवडाभरात दाखल करण्याच्या सूचना तसेच रस्ता निधीचा १ कोटी रूपयाचा धनादेश सुपूर्द केला. न.प. अध्यक्ष बंडुबापू देशमुख यांनी आपल्या पहिल्याच बुलडाणा दौर्यात शेगाव पालिकेला २ कोटी ९२ लाख रूपयाचा निधी मिळविला आहे. शेगाव न.प.चा २0१४ या वर्षातील मंजूर १ कोटी ९२ लक्ष रूपयाचा निधी परत जाणार होता, मात्र नगराध्यक्ष देशमुख यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेवून सविस्तर चर्चा केली व परत जाणारा निधी पालिकेकडे पुन्हा वळती केला. या बैठकीनंतर जिल्हाधिकार्यांनी शेगाव आराखड्याबाबत न.पअध्यक्ष बंडुबापू देशमुख, शरदसेठ अग्रवाल, किरणबाप्पु देशमुख, गोपाल कलोरे यांचेसोबत सविस्तर चर्चा केली व लवकरच शेगाव येथे विकास आराखड्याबाबत बैठक घेऊन अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.