श्री शारंगधर बालाजी प्रगटदिन महोत्सव गुरुवारपासून!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 00:17 IST2017-11-22T00:16:12+5:302017-11-22T00:17:00+5:30
मेहकर येथील जगप्रसिद्ध श्री शारंगधर बालाजी प्रगटदिन महोत्सवाला २३ नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. या महोत्सवात विविध धार्मिक, कीर्तन, प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे.

श्री शारंगधर बालाजी प्रगटदिन महोत्सव गुरुवारपासून!
लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकर : येथील जगप्रसिद्ध श्री शारंगधर बालाजी प्रगटदिन महोत्सवाला २३ नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. या महोत्सवात विविध धार्मिक, कीर्तन, प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवादरम्यान भाविकांना नयनरम्य पोशाखात श्रींच्या दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. ७ डिसेंबरला महाप्रसादाने या महोत्सवाचा समारोप होणार आहे.
या महोत्सवात रविवार, २६ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान सकाळी दहा ते १, दुपारी ३ ते ५ या वेळेत श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. भागवताचार्य बंडू देव महाराज आचरसोंडकर (औंढा नागनाथ) यांचे अमृतवाणी तून भागवत कथेचे वाचन होणार आहे. २३ नोव्हेंबरला सकाळी ९.३0 वाजता संस् थांचे अध्यक्ष डॉ. ना. म. सावजी यांच्या हस्ते ध्वजपूजन आणि ध्वजारोहणने या उ त्सवास सुरुवात होणार आहे. दररोज रात्री ८ वाजता महाराष्ट्रातील नामवंत हरिभक् त परायण महाराजांची कीर्तने होणार आहेत. प्रवचनाचेही येथे आयोजन करण्यात आलेले आहे.
२६ नोव्हेंबरला सकाळी १0 वाजता मोठय़ा राम मंदिरातून कलश शोभायात्रा निघणार असून, ११ वाजता श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञास सुरुवात होणार आहे. यावर्षी भागवत कथेचे यजमानपद डॉ. वृषाली व डॉ. विनय सावजी यांनी स्वीकारले आहे. ३0 नोव्हेंबरला गीता जयंतीनिमित्त सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान गीतेचे अखंडपाठ होणार आहे. १ डिसेंबरला दुपारी ११ ते ५ महिला व मुलींसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, डॉ. अरुण देशपांडे रुग्णांना तपासणार आहेत.
३ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता श्रींची पालखी व शोभायात्रा काढण्यात येईल.
४ डिसेंबरला सकाळी १0 वाजता देवदत्त महाराज पितळे यांचे काल्याचे कीर्तन होणार असून, प्रक्षाळ पुजेसाठी रात्री मंदिर बंद होईल. ७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता भव्य महाप्रसादाने उत्सवाचा समारोप होणार आहे. उत्सवादरम्यान आयोजि त विविध कार्यक्रमांचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन बालाजी संस् थानच्यावतीने करण्यात आले आहे.