कुरूक्षेत्रावर शंकर महाराजांचे गीता पठण; ‘जागृती’ची कुरूक्षेत्रावर गीता जयंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 16:30 IST2018-12-19T16:29:26+5:302018-12-19T16:30:30+5:30
खामगाव : येथील जागृती-तपोवन आश्रमाचे मठाधिपती प.पू. शंकरजी महाराज यांनी हरियाणातील कुरूक्षेत्र येथे आपल्या हजारो अनुयासंह गीतेचं पठण केले.

कुरूक्षेत्रावर शंकर महाराजांचे गीता पठण; ‘जागृती’ची कुरूक्षेत्रावर गीता जयंती
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : येथील जागृती-तपोवन आश्रमाचे मठाधिपती प.पू. शंकरजी महाराज यांनी हरियाणातील कुरूक्षेत्र येथे आपल्या हजारो अनुयासंह गीतेचं पठण केले. जागृती आश्रमाच्यावतीने ऐतिहासिक गीताजयंती निमित्त हा धार्मिक उपक्रम घेण्यात आला.
कुरुक्षेत्र हे भारत देशाच्या हरियाणा राज्यातील एक ऐतिहासिक शहर असून धर्मक्षेत्र असेही संबोधले जाते. कुरुक्षेत्रचे नाव पौराणिक काळामधील कुरू राजावरून पडले आहे. महाभारतामधील कौरव व पांडवांदरम्यान झालेले कुरुक्षेत्र युद्ध येथेच लढले गेले असे मानले जाते. या युद्धादरम्यान आप्तेष्ठांसोबत लढण्यास अनुत्सुक असलेल्या अजुर्नाला उपदेश देण्यासाठी भगवान कृष्णांनी भगवतगीता सांगितली होती. कुरुक्षेत्र हे भारत देशाच्या हरियाणा राज्यातील एक ऐतिहासिक शहर असून त्याला धर्मक्षेत्र असेही संबोधले जाते. कुरुक्षेत्रचे नाव पौराणिक काळामधील कुरू राजावरून पडले आहे. महाभारतामधील कौरव व पांडवांदरम्यान झालेले कुरुक्षेत्र युद्ध येथेच लढले गेले, असा समज आहे. या युद्धादरम्यान आप्तेष्ठांसोबत लढण्यास अनुत्सुक असलेल्या अजुर्नाला उपदेश देण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी मार्गशीर्ष शुक्ल एकादशीला याठिकाणी भगवत गीता सांगितल्याचा उल्लेख धर्मग्रंथात आहे. त्यामुळे या ठिकाणी गीता जयंती साजरी करण्याचे वेगळे महत्व असून मार्गशीर्ष शुक्ल एकादशी हा भगवद् गीतेच्या जयंतीचा दिवस म्हणून साजरा होतो. यावर्षी कुरूक्षेत्र येथे गीता जयंती साजरी करण्यासाठी जागृती-तपोवन आश्रमाचे मठाधिपती प.पू. शंकरजी महाराज आपल्या अनुयांसोबत गेले आहेत. गीताजयंतीच्या पर्वावर तेथे गीतापठण आणि ५१ हजार नामजपही तेथे करण्यात आला.