पिंपळगांवच्या सरपंचपदी शोभा काकड अविरोध

By Admin | Updated: April 15, 2017 00:15 IST2017-04-15T00:15:47+5:302017-04-15T00:15:47+5:30

देऊळगांवराजा : तालुक्यातील पिंपळगांव बुद्रुक ग्रामपंचायतच्या सरपंचपदी शोभा प्रभु काकड यांची अविरोध निवड गुरुवारी करण्यात आली.

Shampa Kakad uncontrolled for Pimpalgaon Sarpanch | पिंपळगांवच्या सरपंचपदी शोभा काकड अविरोध

पिंपळगांवच्या सरपंचपदी शोभा काकड अविरोध

देऊळगांवराजा : तालुक्यातील पिंपळगांव बुद्रुक ग्रामपंचायतच्या सरपंचपदी शोभा प्रभु काकड यांची अविरोध निवड गुरुवारी करण्यात आली. मावळत्या सरपंच आशा भगवान नागरे यांनी पदाच्या राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी निवडणूक घेण्यात आली.
पिंपळगांव बुद्रुक ग्रामपंचायतची सदस्य संख्या नऊ असून गुरुवारी निवडणूक प्रक्रियेच्या वेळी सहा सदस्य सभागृहात हजर होते. निवडणूक अधिकारी आयएम भाबले, तलाठी एस.बी.बरांडे, ग्रामसचिव एस.पी.मेहेत्रे यांच्याकडे निर्धारीत वेळेत सरपंचपदासाठी शोभा प्रभु काकड यांचा एकमेव अर्ज सादर झाल्याने त्यांची अविरोध निवड निश्चित झाली होती. सरपंचपदाच्या उमेदवार शोभा प्रभु काकड, उपसरपंच वसंता नागरे, सविता काकड, अंजनी काकड, आशा नागरे, नजमा पठाण यांची सभागृहात उपस्थिती होती. शोभा काकड यांच्या नावाला अधिकाऱ्यांनी शोभा काकड यांची सरपंचपदी अविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
यावेळी नवनिर्वाचीत सरपंच शोभा काकड, प्रभु काकड यांचे पुष्पहारांनी स्वागत करुन समर्थकांनी ग्रामपंचायत आवारात आनंद साजरा केला. पोलिस पाटील, तंटामुक्त समिती अध्यक्ष गावांतील नागरिक महिला यांची हजेरी होती.

 

Web Title: Shampa Kakad uncontrolled for Pimpalgaon Sarpanch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.