काकाकडून पुतणीचे लैंगिक शोषण

By Admin | Updated: May 10, 2017 07:15 IST2017-05-10T07:15:44+5:302017-05-10T07:15:44+5:30

मोताळा तालुक्यातील घटना.

The sexual harassment of the uncle | काकाकडून पुतणीचे लैंगिक शोषण

काकाकडून पुतणीचे लैंगिक शोषण

धामणगाव बढे : मोताळा तालुक्यातील सारोळा मारोती येथील काकाने पुतणीचे एक वर्ष लैंगिंक शोषण केले असून, त्यामुळे पुतणीला अपत्य झाल्याची खळबळजनक घटना मंगळवारी उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला.
सारोळा मारोती येथे रामकृष्ण मधुकर वांगेकर (वय २४) याने शेजारी राहणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन चुलत पुतणीवर वारंवार लैंगिक अत्याचार केला. त्यामुळे सदर मुलगी गर्भवती राहिली व तिला अपत्य झाले. सदर प्रकार कुटुंबीयांच्या लक्षात आल्यावर त्यांनी धामणगाव बढे पोलीस ठाण्यात ९ मे रोजी तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी वांगेकरविरुद्ध कलम ३७६, कलम २७६ (२), ५०६ सह कलम ४,८ बालक लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे. घटनेचा तपास ठाणेदार दीपक वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली माधव पेठकर, समाधान तायडे, समाधान देशमाने, ज्ञानेश्वर दहातोंडे करीत आहेत.

Web Title: The sexual harassment of the uncle