अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण
By Admin | Updated: August 11, 2016 01:36 IST2016-08-11T01:36:05+5:302016-08-11T01:36:05+5:30
मोताळा तालुक्यातील घटना.
_ns.jpg)
अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण
मोताळा(जि. बुलडाणा), दि १0 : अल्पवयीन मुलीच्या आई, वडील व भावास जीवे मारण्याची धमकी देऊन तिचे लैंगिक शोषण करणार्या युवकास बोराखेडी पोलिसांनी बुधवारी गजाआड केले. या प्रकरणी पोलिसांनी युवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दाभाडी येथील प्रमोद शांताराम सुरडकर (३0) या युवकाने १0 मे २0१६ ते ८ ऑगस्ट २0१६ च्या दरम्यान गावातीलच एका १६ वर्षीय मुलीस तीच्या आई, वडील व भावास जीवे मारण्याची धमकी देऊन लैंगिक शोषण केले, अशी तक्रार पीडित मुलीने १0 ऑगस्ट रोजी बोराखेडी पोलीस ठाण्यात दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३७६, ४५२ सह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा ३, ४, ८, १२ नुसार गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. तपास ठाणेदार दीपक कोळी करीत आहेत.