अल्पवयीन मुलाचे ७० वर्षीय नराधमाकडून लैंगिक शोषण!
By Admin | Updated: April 9, 2017 23:57 IST2017-04-09T23:57:46+5:302017-04-09T23:57:46+5:30
सिंदखेडराजा (जि. बुलडाणा)- तुळजापूर येथील ७० वर्षीय नराधमाने एका शाळकरी मुलाचे लैंगिक शोषण केल्याची घटना ८ एप्रिल रोजी सायंकाळी घडली.

अल्पवयीन मुलाचे ७० वर्षीय नराधमाकडून लैंगिक शोषण!
सिंदखेडराजा (जि. बुलडाणा) : सिंदखेडराजा पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या तुळजापूर येथील ७० वर्षीय नराधमाने एका शाळकरी मुलाचे लैंगिक शोषण केल्याची घटना ८ एप्रिल रोजी सायंकाळी घडली. हा प्रकार लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी तेथे धाव घेतली व त्या वृद्धास चोप दिला. याप्रकरणी पोलिसांनी रविवारी गुन्हा दाखल केला. सिंदखेडराजा येथून जवळच असलेले तुळजापूर येथील इयत्ता पाचवीत शिकणारा मुलगा हा गावातील वाचनालयात पेपर वाचण्यासाठी गेला असता, तेथे काम करणाऱ्या ७० वर्षीय पंढरी नेहाजी मंडपे याची नजर त्या चिमुकल्या निरागस बालकावर पडली. तेथे कोणीही नसल्याचा फायदा घेऊन या नराधमाने वाचनालयाचा दरवाजा आतून बंद केला. काही समजण्याच्या आत त्याने मुलावर अनैसर्गिक कृत्य करणे सुरू केले. दरम्यान, वाचनालय परिसरात असलेल्या काही जणांना शंका आल्याने त्यांनी वाचनालयाकडे धाव घेतली असता हा प्रकार उघडकीस आला.
सदर कृत्य पाहून गावकऱ्यांनी त्यास बेदम चोप दिला. या घटनेनंतर गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. सदर गैरकृत्य करणाऱ्या आरोपीवर बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ नुसार कलम ४ या अन्वये कलम ३७७/ ३ (ब) नुसार गुन्हा दाखल केला. दरम्यान, आरोपी वृद्धास जबर मारहाण झाल्यामुळे जखमी स्थितीमध्ये त्यास जालना येथे हलविण्यात आले.