लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण

By Admin | Updated: September 12, 2016 02:53 IST2016-09-12T02:53:09+5:302016-09-12T02:53:09+5:30

एका पारिचारिकेला (वय ३०) लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी वारंवार शरीरसंबंध प्रस्थापित करणाऱ्या मध्य प्रदेशातील एका आरोपीवर...

Sexual abuse by showing lover of marriage | लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण

लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण

परिचारिकेची तक्रार : प्रियकराविरुद्ध गुन्हा
नागपूर : एका पारिचारिकेला (वय ३०) लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी वारंवार शरीरसंबंध प्रस्थापित करणाऱ्या मध्य प्रदेशातील एका आरोपीवर नंदनवन पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला.
टिकेंद्र युवराज बिसेन (वय ३०) असे आरोपीचे नाव आहे. रोंडीवाडा (ता. बरघाट, जि. शिवनी) येथील रहिवासी असलेला बिसेन खासगी वाहनचालक आहे. त्याची बहीण वाठोड्यात राहते. तिच्या प्रसूतीच्या निमित्ताने आरोपी बिसेन एप्रिल महिन्यात नागपुरात जावयाच्या घरी आला होता. बहीण दाखल असलेल्या रुग्णालयात बहिणीचा जेवणाचा डब्बा, औषध घेऊन जात असल्याने त्याची पीडित पारिचारिकेसोबत ओळख झाली. त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध जुळले. दोघांनी लग्नाचा निर्णय घेतल्याने त्यांच्यात वारंवार शरीरसंबंध प्रस्थापित झाले. अलीकडे मात्र तो तिला टाळू लागला.
त्यामुळे तिने नंदनवन ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलीस उपनिरीक्षक सोनाली वगारे यांनी रविवारी बिसेनविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंदविला.(प्रतिनिधी)

Web Title: Sexual abuse by showing lover of marriage