विवाहितेवर लैंगिक अत्याचार
By Admin | Updated: June 29, 2017 00:07 IST2017-06-29T00:07:17+5:302017-06-29T00:07:17+5:30
लोणार : तालुक्यातील पांग्रा डोळे येथील ४५ वर्षीय विवाहित महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी डॉ. प्रल्हाद उत्तम घुगे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

विवाहितेवर लैंगिक अत्याचार
लोकमत न्यूज नेटवर्क
लोणार : तालुक्यातील पांग्रा डोळे येथील ४५ वर्षीय विवाहित महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी डॉ. प्रल्हाद उत्तम घुगे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित महिलेच्या पतीचे आॅपरेशन असल्याने ते शिर्डीला गेले होते. फिर्यादी महिला शिर्डीला जाण्यासाठी सकाळी चार वाजता उठून स्वयंपाक करीत असताना डॉ. प्रल्हाद उत्तमराव घुगे याने सदर महिलेस जीवे मारण्याची धमकी देऊन बलात्कार केला. महिलेच्या तक्रारीवरून डॉ. प्रल्हाद उत्तमराव घुगे विरुद्ध कलम ३७६, ४५२, ५०६ भादंवि नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.