सात वर्षीय बालकाचा पूर्णा नदीत बुडून मृत्यू

By Admin | Updated: July 10, 2014 01:33 IST2014-07-09T23:46:06+5:302014-07-10T01:33:01+5:30

मलकापूर तालुक्यातील धरणगाव येथील सात वर्षीय चिमुकल्याची घटना

Seven-year-old child drowns in the Purna river | सात वर्षीय बालकाचा पूर्णा नदीत बुडून मृत्यू

सात वर्षीय बालकाचा पूर्णा नदीत बुडून मृत्यू

मलकापूर : धरणगाव येथील सात वर्षीय चिमुकला आजीसोबत धुपेश्‍वर येथे देवदर्शनासाठी गेला असता त्याचा पूर्णानदीत बुडून मृत्यू झाला. ही घटना काल ८ जुल ै रोजी संध्याकाळी घडली.
धरणगाव येथील कौस्तुभ विवेक पाटील (खर्चे) (वय ७) हा आजी शांताबाई लक्ष्मण पाचपांडे (वय ५0) हिचे समवेत धुपेश्‍वर येथे काल दुपारी ४.३0 वा.देवदर्शनासाठी गेला होता. मात्र त्याचा धुपेश्‍वर येथील पूर्णा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. देव दर्शनासाठी गेलेल्या कौस्तुभचा मृतदेहच घरी आल्याने संतप्त गावकर्‍यांनी संशय घेत आजीबाईला चांगलेच बदडून काढले. याबाबतची माहिती शहर पोलिसांना मिळताच पोलिसांनी गावकर्‍यांच्या तावडीतून पोलीस बंदोबस्तात आजीबाईला शहर पोलिस स्टेशनमध्ये आणले. याबाबतची फिर्याद मृत चिमुकल्याच्या पिता विवेक विष्णु पाटील (खर्चे) यांनी शहर पोलीस स्टेशनला दिली. या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी कलम १७४ जाफौ प्रमाणे आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गवारगुरू करीत आहे.

Web Title: Seven-year-old child drowns in the Purna river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.