बुलडाणा जिल्ह्यातील सात पूल धोकादायक
By Admin | Updated: June 24, 2017 05:42 IST2017-06-24T05:42:18+5:302017-06-24T05:42:18+5:30
प्रशासनाचे दुर्लक्ष : पावसाळय़ातील पुरादरम्यान उद्भवते बिकट स्थिती.

बुलडाणा जिल्ह्यातील सात पूल धोकादायक
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: बर्याच वेळा पावसाळ्यात नदी-नाल्यांना पूर आला की, पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे गावांचा संपर्क तुटतो. यामुळे जीवितहानी होण्याची शक्यताही जास्त असते. त्यामुळे नदी व मार्गावरील पुलनिर्मिती करताना गांभीर्याने पाहिले जाते; परंतु जिल्ह्यात सद्यस्थितीत ब्रिटिशकाळी २१ पूल असून, त्यापैकी सात पुलांची अवस्था धोकादायक आहे.
गावाच्या विकासासाठी शासनाने ग्रामीण भागात बर्याच ठिकाणी नवीन पुलांची निर्मिती केली आहे. शिवाय बरेच पूल १९२६ ते १९३९ या ब्रिटिश काळात बांधण्यात आले आहे. या पुलांची मजबुती कायम ठेवण्यासाठी पुलांची उंची कमी ठेवण्यात आली आहे. नदी-नाल्यांवर निर्माण केलेले पूल मजबूत असणे आवश्यक आहे; मात्र बर्याच वेळा पावसात ग्रामीण भागात नदीला पूर आल्यामुळे पुलांच्या सुरक्षा कठड्याची पडझड होऊन नुकसान होते. काही वेळा यामुळे गावाचाही संपर्क तुटतो.
बुलडाणा शहर ब्रिटिशकाळात ब्रिटिश प्रशासनाचे मुख्यालय होतो. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाबाबत जागरूकता दाखवत ब्रिटिश अधिकार्यांनी येथील विविध नद्यांवर अनेक पुलांची निर्मिती केले. यापैकी सद्यस्थितीत सात पुलांचा वाहतुकीसाठी वापर केला जातो; मात्र या पुलांची प्रशासनाकडे नियमित देखभाल होत नसल्यामुळे सर्वच पूल जर्जर झाले आहे. यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन या पुलांवर प्रवास करावा लागतो.
धाड-धामणगाव रोडवरील पूल धोकादायक
धाड: गत २0 ते २२ वर्षांंंपूर्वी बांधण्यात आलेल्या धाडनजीक बाणगंगा नदीवरील पुलामुळे रहदारी आणि नागरी वस्तीस धोका निर्माण झाला आहे. पुलाच्या सुरक्षेबाबत चिखली सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अद्याप कुठलीच उपाययोजना न केल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात नदीचे पाणी या पुलावरून वाहते. शिवाय परिसरातील कचरा पुलात अडकत असल्यामुळे हा पूल नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. धाडनजीक धामणगाव धाड रोडवर बाणगंगा नदीवर करडी धरण बांधण्यात आले आहे. या धरणाच्या साडव्याचे पाणी ही गावलगत जुन्या फरशी परिसरात येऊन पोहचल्यामुळे त्यावेळी चिखली सार्वजनिक बांधकाम विभागाने घाईघाईत सिमेंटची पाइप टाकून बाणगंगा नदीवर २0 फूट रुंदीचा आणि साधारण २00 फुटांपेक्षा अधिक लांबीच्या पुलाचा पूल बांधला. पुलाची उंची कमी असल्यामुळे जास्त पाऊस झाला की या पुलापर्यंंंत धरणाचे पाणी येऊन साचले आणि नदीला पूर आला की, पुलामध्ये काडीकचरा, गाळ, झाडी-झुडपे अडकून पुराचे पाणी पुलावरून वाहते, बर्याच वेळा हे पाणी गावात शिरले, त्यामुळे या पुलाची एक बाजू ढासळून गेली. त्यामुळे पुलावरून पाणी वाहत असतांना पाण्यात वाहने कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. सुरूवातीच्या काही वर्षात सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रत्येक उन्हाळ्यात पुलातील गाळ, साचलेला कचरा साफ करून पुलाचे पाइप मोकळे करण्याचा नियमित उपक्रम चालू ठेवला होता; परंतु मागील काही वर्षांंंपासून हा उपक्रम बंद झाला आहे. या ठिकाणी बांधकाम विभागाकडून नवीन पुलासाठी सर्वेक्षण केले होते.
ब्रिटिशकाळीन पूल
मार्ग नदी वर्ष
मलकापूर - जालना (आमना) १९३९
मलकापूर - जालना (खडकपूर्णा) १९२६
जालना - मेहकर (पैनगंगा) १९२६
नांदुरा - मोताळा (विश्वगंगा) १९३३
येरली (पूर्णा ) १९२६
टिवरोडा (पूर्णा ) (उपलब्ध नाही )
खामगाव - चिखली (मन) (उपलब्ध नाही )