जिल्ह्यातील सात जणांची काेराेनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:39 IST2021-09-23T04:39:24+5:302021-09-23T04:39:24+5:30

बुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे दिलासदायक चित्र आहे़ बुधवारी एकही नवीन रुग्ण पाॅझिटिव्ह आढळलेला नाही़ ...

Seven people from the district defeated Kareena | जिल्ह्यातील सात जणांची काेराेनावर मात

जिल्ह्यातील सात जणांची काेराेनावर मात

बुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे दिलासदायक चित्र आहे़ बुधवारी एकही नवीन रुग्ण पाॅझिटिव्ह आढळलेला नाही़ तसेच सात रुग्णांनी काेराेनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे़ तसेच ९९१ काेराेना अहवल निगेटिव्ह आले आहेत़ सध्या जिल्ह्यात १८ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत़

जिल्ह्यात कोरोना विषाणूने पूर्णपणे माघार घेतल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात बुधवारी पाचव्यांदा नवीन संसर्गित रुग्ण शून्य आढळले आहेत़

जिल्हावासीयांसाठी ही दिलासादायक बाब आहे. मात्र तरीही जिल्ह्यात उपचार घेत असलेले १८ सक्रिय रूग्ण आहे. त्यामुळे जिल्हावासीयांनी मास्क वापरणे, हात वारंवार स्वच्छ धुणे किंवा सॅनिटाईज करणे व सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करणे या त्रिसूत्रींचा अवलंब करावा. तसेच पात्र लाभार्थ्यांनी कोविड लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे आजपर्यंत ७१ हजार २७१ रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत.

७७२ नमुने घेतले निदानासाठी

आज रोजी ७७२ नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण ८७ हजार ५५० कोरोनाबाधित रुग्ण असून त्यापैकी ८६ हजार ८५९ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे १८ सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत ६७३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे

Web Title: Seven people from the district defeated Kareena