सात रुग्णांची काेराेनावर मात : एक पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:35 IST2021-09-11T04:35:47+5:302021-09-11T04:35:47+5:30

बुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाची दुसरी लाट ओसरत असून शुक्रवारी ७ रुग्णांनी काेराेनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे़ ...

Seven patients overcame caries: one positive | सात रुग्णांची काेराेनावर मात : एक पाॅझिटिव्ह

सात रुग्णांची काेराेनावर मात : एक पाॅझिटिव्ह

बुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाची दुसरी लाट ओसरत असून शुक्रवारी ७ रुग्णांनी काेराेनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे़ तसेच देउळगाव राजा तालुक्यातील सिनगाव जहाॅंगीर येथील एकाचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे़ जिल्ह्यातील १२ तालुक्यांमध्ये एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही़ तसेच १२४० काेराेना अहवाल निगेटिव्ह आले आहेत़

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण १२४१ अहवाल प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत ७ लाख २ हजार ६६० रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. आज रोजी १२८० नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण ८७ हजार ५१२ कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी ८६ हजार ७८१ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे ५८ सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत ६७३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Web Title: Seven patients overcame caries: one positive