साडेसहा लाखांचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 01:24 IST2017-10-07T01:23:59+5:302017-10-07T01:24:39+5:30

Seven hundred lacquer gutkha seized | साडेसहा लाखांचा गुटखा जप्त

साडेसहा लाखांचा गुटखा जप्त

ठळक मुद्देअमडापूर गावांतील माणिक चौकात पकडली बोलेरो गाडी दोन जणा पोलिसांच्या ताब्यात, एक फरार

लोकमत न्यूज नेटवर्क

अमडापूर : येथील माणिक चौकात बोलेरो मालवाहक या  गाडीला  पकडून गाडीसह साडे सहा लाखाचा गुटखा जप्त  करण्यात आल्याची घटना ६ ऑक्टोबर रोजी घडली.
चिखली तालुक्यातील अमडापूर गावांतील माणिक चौकात  मोठय़ा प्रमाणात बोलेरो गाडीमध्ये गुटखा येत असल्याची माहिती  मिळाल्यावरून ठाणेदार विक्रांत पाटील यांनी त्याचे सहकारी  पी.एस.आय.उमेश भोसले, पो.ना.संजय नागवे, पो.कांॅ.सतीश  नागरे यांना नाकाबंदी करण्याचे आदेश ठाणेदार पाटील यांनी  दिल्यावरुन खामगाव येथून एम.एच. २७ जे ९३९२ बोलेरो  मालवाहक या गाडीला माणिक चौक अमडापूर येथे पकडून  बोलेरो गाडीसह साडे सहा लाखाचा गुटखा पुड्या माल  पकडण्यात आला. ६ ऑक्टोबर रोजी दुपारी खामगाव येथून  चालक राजू गव्हादे व त्यांचे सोबत वैभव उगरे दोघे रा.खामगाव  हे गाडीमध्ये अमडापूर येथील शे.ऐजाअ, शे.कादर यांचा ६ पोते  गुटखा गोवा, नजर, विमल पान मसाला, सुगंधी तंबाखु असा  माल मोती चौक अमडापूर येथे येताच अमडापूर पोलिसांनी गुट खा मालासह बोलेरो गाडी ताब्यात घेण्यात आली. यामध्ये  चालक राजू गव्हांदे व वैभव उगरे या दोघांना ताब्यात घेण्यात  आले तर गुटखा खरेदी करणार शे.ऐनाब शे.कादर हा फरार  झाला. बोलेरो गाडी व गुटखा असा माल अन्न व नागरी प्रशासन  बुलडाणा विभागाचे अधिकारी गोपाल माहोरे, किशोर साळुखे,  ढोले यांच्या ताब्यात देण्यात आले.

Web Title: Seven hundred lacquer gutkha seized