चिखली येथे मुंगसाजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाची सांगता

By Admin | Updated: February 27, 2015 01:08 IST2015-02-27T01:08:21+5:302015-02-27T01:08:21+5:30

भक्तीला कर्माची जोड देऊन तात्यासाहेबांनी नंदनवन फुलविले-मोघे.

Settling of Munshaji Maharaj Punyathithi Festival at Chikhli | चिखली येथे मुंगसाजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाची सांगता

चिखली येथे मुंगसाजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाची सांगता

चिखली (जि. बुलडाणा): सद्गुरू परमहंस मुंगसाजी महाराजांच्या जीवनातील तत्त्वापासून प्रेरणा घेत भक्तीला कर्माची जोड देऊन कर्मयोगी तात्यासाहेबांनी या परिसरात नंदनवन फुलविले आहे. हजारो हातांना रोजगार मिळवून दिला आहे, तर अनेकांचे जीवन उजळून टाकण्यासाठी शिक्षण संस्थेचे दीप प्रज्वलीत केले आहेत. आता त्यांनी सद्गुरू मुंगसाजी महाराजांचे भव्य मंदिर उभारून त्यावर आपल्या भक्तीचा कळस चढविताना परिसरातील भाविकांसाठी एक श्रद्धास्थान उभारले असल्याचे गौरवोद्गार माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी मुंगसाजी महाराज पुण्यतिथी महोत्सवात बोलताना काढले. श्री मुंगसाजी महाराज सेवा प्रतिष्ठाण चिखलीच्यावतीने गत ७ वर्षापासून परमहंस श्री मुंगसाजी महाराज यांची पुण्यतिथी उत्साहात पार पाडल्या जात असते. यावर्षी प्रथमच श्री मुंगसाजी महाराजांचे धोलपुरी दगडातील भव्य मंदिराची उभारणी करून त्यात महाराजांची मूर्ती प्रतिष्ठापीत करण्यात आली असून, पुण्यतिथीनिमित्त यावर्षी तीन दिवसीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

Web Title: Settling of Munshaji Maharaj Punyathithi Festival at Chikhli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.