भाविकांचे बूट पॉलिश करून केली सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:32 IST2021-03-06T04:32:37+5:302021-03-06T04:32:37+5:30

संत गजानन महाराज यांचा प्रगटदिन यावर्षी कोरोनामुळे सध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. डोणगाव येथे मात्र ‘मानव सेवा, हीच ईश्वर ...

Service done by polishing the shoes of the devotees | भाविकांचे बूट पॉलिश करून केली सेवा

भाविकांचे बूट पॉलिश करून केली सेवा

संत गजानन महाराज यांचा प्रगटदिन यावर्षी कोरोनामुळे सध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. डोणगाव येथे मात्र ‘मानव सेवा, हीच ईश्वर सेवा’ समजून आगळा-वेगळा प्रगटदिन साजरा करण्यात आला. डोणगांव येथील वृक्षमित्र गणेश गोळे हे झाले लावण्याचा संदेश प्रत्येकाला देतात. यावर्षी ५ मार्चला त्यांनी डोणगांव येथील गजानन महाराज मंदिर गाठले आणि तेथे दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकांचे बूट साफ करून पॉलिश करून दिले. मग तो लहान मुलगा असो, वा ज्येष्ठ नागरिक. त्यांनी मंदिरात येणाऱ्या प्रत्येकाला मास्क लावा व गर्दी न करण्याचे आवाहन केले. त्यांच्या या आगळ्या वेगळ्या मानवसेवेचे कौतुक होत आहे.

Web Title: Service done by polishing the shoes of the devotees