सेवेकऱ्याच्या मुलीचा दहावीच्या परीक्षेत झेंडा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 12:51 IST2019-06-09T12:51:18+5:302019-06-09T12:51:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : हलाखीच्या परिस्थितीला जिद्दीने तोंड देत, सेवेकऱ्याच्या मुलीने दहावीच्या परिक्षेत घवघवीत यश संपादन केले. कोणताही ...

सेवेकऱ्याच्या मुलीचा दहावीच्या परीक्षेत झेंडा!
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : हलाखीच्या परिस्थितीला जिद्दीने तोंड देत, सेवेकऱ्याच्या मुलीने दहावीच्या परिक्षेत घवघवीत यश संपादन केले. कोणताही शिकवणी वर्ग न लावता वैष्णवी पेसोडे हीने देदिप्यमान यश संपादन केले. शेलोडी येथील जागृती ज्ञानपीठचा निकाल १०० टक्के लागला असून, वैष्णवीने शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकाविला आहे.
शेलोडी येथील जागृती आणि सजनपुरी येथील तपोवन आश्रमात सेवेकरी असलेल्या केशव पेसोडे यांची परिस्थिती अंत्यत हलाखिची आहे. प्रतिकुल परिस्थितीत संसाराचा गाडा ओढताना त्यांची प्रचंड ओढाताण होते. घरखर्च भागवावा की मुलांचे शिक्षण पूर्ण करावे? असा दुहेरी पेच समोर असताना पेसोडे यांनी वैष्णवीला शाळेत प्रवेश दिला. अभ्यासात हुशार असलेल्या वैष्णवीने आपल्या गुणवत्तेच्या जोरावर शनिवारी जाहीर झालेल्या निकालात घवघवीत यश संपादन केले. प्रतिकुल परिस्थितीवर मात करीत, कोणताही शिकवणी वर्ग न लावता, तिने मिळविलेले यश हे देदीप्यामान असल्याची प्रतिक्रीया आता समाजमनात उमटत आहे. ९२.२० टक्के गुण घेत जागृती ज्ञानपीठ शेलोडीमधून ती अव्वल ठरली आहे. या यशाबद्दल वैष्णवीचा जागृती आश्रमाचे मठाधिपती प.पू. शंकरजी महाराजांची सत्कार केला. यावेळी समाजोत्थानासाठी झटणारे प्रत्येक महापुरूष आपले आदर्श असून, समाजातील वंचित आणि कष्टकºयांचरणी आपले यश समर्पित आहे. भविष्यात आयएएस अधिकारी होवून समाजातील गरीब कष्टकºयांची सेवा करण्याचा आपला संकल्प असल्याचे वैष्णवीने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
सत्कर्माच्या सुंगधाचा हा दरवळ आहे. जागृती येथील जागृती ज्ञानपीठचा शंभर टक्के निकाल लागला असून, ग्रामीण भागातील मुलींनी प्राप्त केलेले यश अतुलनीय आहे. नापासांच्या आयुष्यात आमुलाग्र बदल ‘जागृती’ने घडविले. त्यानंतर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यावर ‘जागृती’चा भर आहे. सकारात्मक प्रयत्नांना चांगले यश मिळत आहे.
- प.पू. शंकर महाराज
संस्थापक, जागृती ज्ञानपीठ, शेलोडी.