शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

कोविडची लक्षणे असलेल्या विद्यार्थ्यांची स्वतंत्र बैठक व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 8:21 PM

पूर्व परीक्षेसाठी आयोगाने प्रवेशपत्र २८ सप्टेंबरपासून उमेदवारांच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे.

- संदीप वानखडे

बुलडाणा  : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाºया राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी सर्दी, ताप आणि खोकला असलेल्या विद्यार्थ्यांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. येत्या ११ आॅक्टोबर रोजी होत असलेल्या पूर्व परीक्षेसाठी आयोगाने प्रवेशपत्र २८ सप्टेंबरपासून उमेदवारांच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे.कोरोना संसर्ग वाढत असल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा लांबल्या आहेत. अखेर सुधारीत वेळापत्रकानुसार राज्य सेवा पूर्व परीक्षा ११ आॅक्टोबर राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर होणार आहे. त्यासाठी आयोगाने प्रवेशपत्र विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले असून विद्यार्थ्यांना दीड तास आधी परीक्षा केंद्रावर पोहचण्याची सुचना केली आहे. केंद्रावर प्रवेश करताच उमेदवारांची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच थर्मो गनच्या सहाय्याने उमेदवारांच्या शारीरिक तापमानाची  तपासणी करण्यात येणार आहे. यावेळी एखाद्या उमेदवारामध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्यांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच उमेदवारांना मास्क अनिवार्य करण्यात आला आहे. मधल्या सुटीत विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र सोडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.  परीक्षा उपकेंद्रामध्ये प्रवेश करतांना उमेदवाराने किमान तीन पदरी मुखपट (मास्क) अनिवार्य करण्यात आले आहे. परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रीयेदरम्यान उमेदवारांनी स्वच्छता पाळणे तसेच आरोग्य हितकारक वातावरण ठेवण्यासाठी हात सतत सॅनिटाईज करण्याची सुचना प्रवेश पत्रात करण्यात आली आहे.तसेच उमेदवारांना आरोग्य सेतु अ‍ॅप डाउनलोड करणे हितावह राहणार असल्याचे म्हटले आहे. तसेच परीक्षा कक्षात एकमेकांचे पने, लिखाण साहित्य वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाexamपरीक्षा