काँग्रेसच्या उमेदवारीकडे सेनेचे लक्ष
By Admin | Updated: August 18, 2014 23:44 IST2014-08-18T23:06:35+5:302014-08-18T23:44:25+5:30
गेल्या पंधरा वर्षांपासून शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या या मतदारसंघात आता शिवसेनेतच कुरघोडीचे राजकारण सुरू झाले आहे.

काँग्रेसच्या उमेदवारीकडे सेनेचे लक्ष
बुलडाणा: जिल्हा मुख्यालय असलेल्या बुलडाणा विधानसभा मतदारसंघातील राजकारण सध्या चांगलेच चर्चेत आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या या मतदारसंघात आता शिवसेनेतच कुरघोडीचे राजकारण सुरू झाले आहे. सेनेतील या कुरघोडी थांबविण्यासाठी पक्षपातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. तर काँग्रेसमध्ये उमेदवारांच्या मुलाखती आटोपल्या असून, तिकिटासाठी जंगी स्पर्धा सुरू असल्याचे चित्र स्पष्टपणे समोर आले आहे. मुळातच येथील लढाई ही काँग्रेस विरुद्ध सेना अशीच होणार असल्याने शिवसेनेचे उमेदवार विद्यमान आमदार विजयराज शिंदे यांच्या विरोधात काँग्रेसचा उमेदवार कोण, याकडे सेनेचे लक्ष लागून आहे.
बुलडाणा मतदारसंघामध्ये शिवसेनेत आमदार विजयराज शिंदे यांच्या विरोधात सुरू असलेल्या लहान-मोठय़ा करबुरीं ठळकपणे समोर आल्या असून, यामुळे त्यांची उमेदवारी कापली जाईल ही शक्यता अजिबात नाही. मात्र या निमित्ताने सेनेतील त्यांचे विरोधक समोर आले आहेत. राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी उतावीळ झालेल्या सेनेने यापूर्वीच सर्व विद्यमान आमदारांना निवडणुकीसाठी मोकळे सोडले आहे त्यामुळे शिंदे आधीच कामाला लागले आहेत. मुळातच आ. शिंदे यांचा असलेला जनसंपर्क ही त्यांची जमेची बाजू आहे त्यामुळे त्यांची प्रतिमा ह्यडॅमेजह्ण करण्याचे प्रयत्न सातत्याने होत असले तरी आ. शिंदे यांनी विरोधकांवर मात करीत मातोङ्म्रीचा आशीर्वाद कायम ठेवला आहे. जिल्हाप्रमुखांच्या कार्यक्षेत्रात तडकाफडकी झालेला बदल ही त्याची चुणूक होती व आता उघडपणे बंड पुकारणारे शहरप्रमुखही पदावरून हटविल्या गेले. त्यामुळे मोदी नावाचा अँडव्हान्टेज घेत यावेळी आ. शिंदे यांची जनता गाडी 'लाल' दिव्यापर्यंत पोहचेल या दृष्टीने सेनेने काम सुरू केले आहे.
शिवसेनेच्या आतापर्यंतच्या विजयामध्ये काँग्रेसमधील असंतुष्टांकडून आतून मिळणार्या रसदीचा वाटा मोठा राहिला आहे. त्यामुळेच कोण कधी कामात येईल, या हेतूने संपूर्ण आमदारकीच्या काळात आ. शिंदे यांनी कुण्याही काँग्रेस नेत्याला टीकेचे लक्ष्य न करता आपले काम करण्यातच धन्यता मानली. हाच प्रकार काँग्रेसच्या गोटात आहे. कोणत्याही काँग्रेस नेत्याने गेल्या पाच वर्षात आ. शिंदे यांना उघड आव्हान दिले नाही त्यामुळे जोपर्यंत उमेदवार ठरत नाही, तोपर्यंत बुलडाण्याची लढाई स्पष्ट होत नाही.
लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या झालेल्या देशपातळीवरील पराभवाने सारेच सुन्न आहेत. तिकिटासाठी काँग्रेसमध्येही मोठी स्पर्धा असली तरी लोकसभेतील पराभावामुळे प्रत्येक इच्छुक ह्यरिस्कह्ण घेण्यापूर्वीची चाचपणी करत आहे. सेनेतील वातावरण, कुठल्याही विद्यमान आमदारांप्रती प्रत्येक वेळी राहत असलेली एन्टीइन्कम्बन्सी ही सध्या काँग्रेसच्या बेरजेची गणिते आहेत. मोदी लाटेतही काँग्रेस-राकाँच्या उमेदवाराला मिळालेली ४३ हजार मते या शिदोरीवर काँग्रेसमधील इच्छुकांची भिस्त आहे.
हर्षवर्धन सपकाळ, संजय राठोड, जयङ्म्री शेळके व धृपदराव सावळे यांनी सामाजिक व राजकीय गणिते मांडून आपला सारीपाट तयार केला आहे, तर दुसरीकडे एकनाथ खर्चे, मुख्यारसिंग राजपूत ज्येष्ठतेचा दावा करीत असून, डॉ. मधुसूदन सावळे, विश्वनाथ माळी यांनाही ह्यलॉटरीह्ण ची आशा आहे. त्यामुळे काँग्रेसमधील प्रत्येक इच्छुक कामाला लागला असल्याचे चित्र आहे.
काँग्रेसमधील ही नेत्यांची दमदार फळी प्रत्यक्षात दहा दिशांनी धावणारी आहे. कुण्या एकालाही तिकीट मिळाले की बाकी सारे एकत्र होत काँग्रेसच्याच उमेदवाराला ह्यहातह्ण दाखवितात.
यावेळी मात्र असे होऊ नये म्हणून सामूहिक नेतृत्वाची नवी टूम जिल्हाध्यक्ष विजय अंभोरे यांनी आणली असून, तिकीट जाहीर होईपर्यंत सर्व इच्छुकांनी एकत्रित प्रचार करावा असा त्यांचा प्रयत्न आहे मात्र इच्छुकांच्या वाढलेल्या महत्त्वाकांक्षा अशा प्रयोगाच्या नादी लागणार नाही, हे स्पष्टच आहे.
जागा वाटप बुलडाणा काँग्रेसकडे असले तरी राष्ट्रवादीलाही आमदारकीचे घुमारे फुटले आहेत. अजितदादांच्या उपस्थितीत शनिवार झालेल्या निर्धार मेळाव्यात या मागणीची ह्यधारह्ण अधिक तीव्र करून काँग्रेसवर राष्ट्रवादीने दबाव वाढविला आहे.
या दोन्ही पक्षांनी लोकसभेतील पराभवापासून धडा घेतला असेल तरच सेनेसोबत होणारा हा सामना अधिक चुरशीचा होईल अन्यथा विधानसभेची कथा मागील पानावरून पुढे सरकेल इतकेच.
अशी सध्या तरी चर्चा आहे. खरे चित्र काँग्रेसचा उमेदवार कोण, यावरच अवलंबून आहे.