चोरी करून आणलेली गाय विकली; शेगावात काही काळ तणाव
By Admin | Updated: June 29, 2017 19:55 IST2017-06-29T19:55:04+5:302017-06-29T19:55:04+5:30
शेगाव : चोरी करून आणलेली गाय शेगाव शहरात विकत घेतल्याचे समजल्या नंतर गुरुवारी शेगावात मुरारका विद्यालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

चोरी करून आणलेली गाय विकली; शेगावात काही काळ तणाव
लोकमत न्यूज नेटवर्क
शेगाव : चोरी करून आणलेली गाय शेगाव शहरात विकत घेतल्याचे समजल्या नंतर गुरुवारी शेगावात मुरारका विद्यालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेऊन सर्वांना पो.स्ट. ला आणल्याने तणाव निवळला.
शेगाव शहरातील मुरारका विद्यालयाच्या मागे राहणाऱ्या रुकसाना बी उम्मीद खाँ या महिलेने दोन दिवसांपूर्वी चिंचोली ता. शेगाव येथील भास्कर गिरी नामक इसमाकडून एक गाय ३२०० रुपयात विकत घेतली होती. याबाबतची माहिती चिंचोली येथील काही युवकांना मिळाल्यावरून त्यांनी गुरुवारी मुरारका विद्यालय परिसरातील त्या घराजवळ पोहचून सदर गायीबाबत विचारणा केली. मात्र यावेळी त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने त्याठिकाणी वाद निर्माण होऊन काही काळ तणाव निर्माण झाले होते. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचून त्यांनी सर्वांना पो.स्टे. ला आणले. यावेळी चौकशी केल्या नंतर सदर गाय मेंढपाळ मैनाबाई चंद्रभान जाधव रा. पिंपळगाव नाथ यांच्या मालकीची असून काही दिवसांपूर्वी ती चिंचोली येथील जनावरांच्या कळपात चालत चालत चिंचोली ला पोहचली होती. यानंतर २ दिवसांपूर्वी गुरे चारणारा भास्कर गिरी याने सदर गाय वाड्यावर पोहचून येतो असे सांगून गावातून गाय शेगाव ला आणून रुकसाना बी उम्मीद खा रा. शेगाव यांना ३२०० रुपयात विकली होती असे पोलिसांना समजले. मात्र गाय कापण्यासाठी जात असल्याची अफवा शहरात पसरल्याने शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. वृत्त लिही पर्यंत पोलिसांनी सदर गायीला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु केली होती.