शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

क्रीडामय वातावरणासाठी लोणारमध्ये सेल्फी पॉईंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 11:50 IST

Selfie point in Lonar : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने लोणार सरोवराच्या काठावर सेल्फी पॉईंट उभारण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : येत्या २३ जुलै पासून आशिया खंडास टोकियोच्या रुपाने दुसऱ्यांदा ऑलिम्पीक स्पर्धा घेण्याचा मान मिळाला आहे. त्यातच कोरोनाचे संक्रमण कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातही क्रीडामय वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीकोणातून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने लोणार सरोवराच्या काठावर सेल्फी पॉईंट उभारण्यात आला आहे.विशेष म्हणजे टोकियो ऑलिम्पीकमध्ये राज्यातील जवळपास दहा खेळाडू सहभागी होत असून त्यांचाही उत्साह वाढावा यासाठी १० जुलै पासून हा उपक्रम सुरू करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने देण्यात आली. ऑलिम्पीक म्हणजे एक प्रकारे क्रीडा क्षेत्राचा कुंभमेळाच होय. त्यातच बुलडाणा जिल्ह्याचाही क्रीडा क्षेत्रात एक वेगळा नाव लौकिक आहे. त्यासंदर्भानेही येत्या काळात खेळाला व खेळाडूंना चालना मिळावी, असा दुहेरी दृष्टीकोण ठेऊन हा सेल्फी पॉईंट उभारण्यात आला आहे. कोविड १९ चा प्रादुर्भाव कमी होत असतांना राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पुन्हा एकदा खेळाचे वातावरण निर्माण करण्याची क्रीडा विभागाची भूमिका आहे. त्यानुषंगाने जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांच्या नेतृत्त्वात या उपक्रमास प्रारंभ झाला आहे. दुसरीकडे यासंदर्भाने बुलडाण्यातील जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल, जिल्हा क्रीडा संकुल, मलकापूर तालुका क्रीडा संकलू, मलकापूर रेल्वे स्टेशन येथेही या सेल्फी पॉईंट लावण्यात आले आहे. 

टॅग्स :Lonarलोणारbuldhanaबुलडाणा