स्वयंप्रेरणेतून विधायक कार्य; ही संघ संस्कृती : राम देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 19:03 IST2017-10-10T19:01:44+5:302017-10-10T19:03:21+5:30

Self-motivating legislative work; This Sangh culture: Ram Deshmukh | स्वयंप्रेरणेतून विधायक कार्य; ही संघ संस्कृती : राम देशमुख

स्वयंप्रेरणेतून विधायक कार्य; ही संघ संस्कृती : राम देशमुख

ठळक मुद्देचिखली नगराचा विजयादशी उत्सवप्राचार्य राम देशमुख यांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : राष्टÑीय स्वयंसेवक संघ राजाश्रयावर जिवित नाही तर राष्ट्रीय पातळीवर अत्यंत महत्वाची भूमिका बजावणारी आणि स्वयंप्रेरणेतून विधायक कार्य करणारी एक संस्कृती असल्याचे प्रतिपादन प्राचार्य राम देशमुख यांनी रा.स्व.संघाच्या विजयादशमी उत्सवात केले.
स्थानिक श्री शिवाजी विज्ञान व कला वरिष्ठ महाविद्यालयच्या क्रिडा संकुलावर ८ आॅक्टोबर रोजी संघाच्यावतीने आयोजित  चिखली नगर विजयादशमी उत्सवात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी स्टेट बँक आॅफ इंडिया चिखली शाखाधिकारी हेमंत बर्वे, जिल्हा संघचालक शांतीलाल बोराळकर, तालुका संघचालक अरविंद असोलकर, नगर संघचालक शरद भाला यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना प्राचार्य देशमुख म्हणाले की,  स्वयंप्रेरणेनतून विधायक कार्य करणे ही आपली संस्कृती आहे, ही अवस्था उत्पन्न करण्यासाठीच संघ काम करतो आहे संघ राजाश्रयावर जिवित नाही. राजाश्रयावर वाढणाºया संघटना आणि संघात खूप फरक आहे. तर भारताला आपली मातृभूमी मानणारे सगळे हिंदू आहेत. या हिंदू समाजाचे एकत्रीकरण हे संघाचे मुख्य कार्य  आहे. त्यामुळे भारतीय म्हणजे हिंदू ही संघाची व्यापक भूमिका आहे. हिंदू समाज हा पुरातन काळापासूनच अनेक वर्ण, जाती, पंथ यात विभागला गेला आहे. प्रत्येक जात स्वत:ला इतरांपेक्षा वेगळी समजते. कोणत्याही प्रकारच्या वर्णद्वेष तसेच जातिभेदाला थारा नसलेल्या व तमाम जातीपंथांमध्ये एकोपा असलेला हिंदू समाज असणे हे संघाला अपेक्षीत असल्याचे स्पष्ट करून राजकीय व्यवस्था म्हणजे राष्ट्र नव्हे तर सांस्कृतिक एकसुत्रता म्हणजे राष्ट्र होय. सांस्कृतिक सभ्यतेची अस्मीता जपण्याचे कार्य संघ पूर्वीपासून करीत आहे. भारत हे हिंदुराष्ट्र आहे याची जाणीव सुद्धा आज संघच करून देत आहे असे राम देशमुख म्हणाले. तर हेमंत बर्वे यांनी आपल्या मनोगतातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना व विजयादशमी उत्सवाचे महत्व विषद केले. प्रास्ताविकात शरद भाला यांनी संघ शाखा नुसते खेळ, कवायती करण्याचे स्थान नसून सज्जनांच्या सुरक्षेचे एक मूक अभिवचन, तरूणांना व्यसनमुक्त ठेवणारे संस्कारपीठ असल्याने नागरिकांनी आपआपली मुले दैनंदिन शाखेत पाठवावी, जेणेकरून येणारी पिढी संस्कारक्षम बनेल असे आवाहन केले. कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांच्या हस्ते शस्त्रपूजनाने झाली. प्रार्थना, घोषवादन, सांघिक गीत, सुभाषित, अमृतवचन तसेच चिखली नगरातील विविध शाखेतील स्वयंसेवकांनी शारीरिक प्रात्याक्षिके सादर केली. 
 

Web Title: Self-motivating legislative work; This Sangh culture: Ram Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.