विषय समिती सभापतींची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2017 00:20 IST2017-04-14T00:20:25+5:302017-04-14T00:20:25+5:30
लोणार- नगर परिषदेच्या बैठकीत आरोग्य व स्वच्छता, अर्थ व नियोजन, महिला व बाल विकास, पाणीपुरवठा, बांधकाम समित्यांवर सभापतींची निवड करण्यात आली.

विषय समिती सभापतींची निवड
लोणार नगरपालिका : समन्वय करून झाली निवडणूक
लोणार : स्थानिक नगरपालिकेच्या विषय समिती सभापतींची निवडणूक १३ एप्रिल गुरुवार रोजी दुपारी ३ वाजता पालिकेच्या सभागृहात पार पडली. येथील नगर परिषदेच्या झालेल्या बैठकीत आरोग्य व स्वच्छता, अर्थ व नियोजन, महिला व बाल विकास, पाणीपुरवठा, बांधकाम समित्यांवर सभापतींची निवड करण्यात आली.
यात काँग्रेसचे शेख समद यांची आरोग्य व स्वच्छता समितीवर, शांतीलाल गुगलीया यांची अर्थ व नियोजन, वंदना जावळे यांची पाणीपुरवठा, सीमा नितीन शिंदे यांची महिला व बाल विकास समितीवर तर खान मोमीन खान यांची बांधकाम समितीवर निवड झाली आहे. सकाळी ११ वाजता सभेच्या पहिल्या टप्प्यात शिवसेना नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेत सभापतीपदी निवड व्हावी, यासाठी हालचाली केल्या; परंतु नगराध्यक्ष भूषण मापारी यांच्या नियोजनापुढे शिवसेना नगरसेवकांनी माघार घेतली. आपसी तडजोडीतून निवडणूक पार पडली. त्यानंतर सभागृहात विषय समिती सदस्य नामनिर्देशन करण्याचे वाचन सुरू करण्यात आले. दुपारी तीन वाजता विविध समित्यांचे सभापती पद जाहीर झाले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार सुरेश कव्हळे यांनी तर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विजय लोहकरे यांनी काम पाहिले.
न.प.उपाध्यक्षाकडे शिक्षण समिती
ागरपालिका शिक्षण समितीच्या सभापती पदावर न.प.उपाध्यक्ष सफिया बेगम नूर महमद खान यांनी निवड झाली. आरोग्य व स्वच्छता समितीवर शेख समद, शांतीलाल गुगलीया यांची अर्थ व नियोजन समितीवर, वंदना जावळे यांची पाणीपुरवठा समितीवर, सीमा नितीन शिंदे यांची महिला व बाल विकास समितीवर तर खान मोमीन खान यांची बांधकाम समितीवर निवड झाली.