जलजीवन अंतर्गत माेताळा तालुक्याची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:35 IST2021-02-05T08:35:08+5:302021-02-05T08:35:08+5:30
माेताळा : जलजीवन योजनेअंतर्गत मोताळा तालुक्यातील सर्व गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यादृष्टीने कृती आराखडासुध्दा तयार करण्यात आला आहे. ...

जलजीवन अंतर्गत माेताळा तालुक्याची निवड
माेताळा : जलजीवन योजनेअंतर्गत मोताळा तालुक्यातील सर्व गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यादृष्टीने कृती आराखडासुध्दा तयार करण्यात आला आहे. आमदार संजय गायकवाड यांनी याबाबत पुढाकार घेतल्यामुळे तालुक्यातील पाणी समस्या मार्गी लागणार आहे. तालुक्यातील पाणी समस्या कायमस्वरूपी संपवावी, या दृष्टीने तालुक्यातील सर्व गावांचा जलजीवन योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. आमदार संजय गायकवाड यांच्या प्रयत्नामुळे तालुक्यातील मौजे तरोडा येथे जलजीवन मिशनअंतर्गत ३ कोटी ५९ लाख रु.निधीची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. यापूर्वी प्रतिव्यक्ती ४० लिटर पाणी मिळायचे, आता जवळपास सन २०२१ ते २०२४ सालापर्यंत प्रतिव्यक्ती प्रतिदिन ५५ लिटर इतका पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. या नियोजनांतर्गत जी जी आवश्यक कामे आहेत ती कामे करण्यात येतील. आमदार संजय गायकवाड यांनी सातत्याने पाठपुरावा करून ही योजना मार्गी लावली आहे. त्यामध्ये प्रादेशिक योजनेंतर्गत तालुक्यातील काही गावांचा समावेश करण्यात आला आहे. जुन्या योजनांची दुरुस्ती, नूतनीकरण करणे आदी कामांचा समावेश करण्यात आला आहे. जीवन प्राधिकरण, ग्रामीण पाणीपुरवठा, भूजल सर्वेक्षण यंत्रणेच्या मदतीने ही कामे मार्गी लागणार आहे. तालुक्यासाठी जवळपास ६० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरात मिळणार आहे.