जप्त केलेली खुर्ची जिल्हाधिका-यांच्या सुपूर्द!

By Admin | Updated: September 24, 2016 02:31 IST2016-09-24T02:31:48+5:302016-09-24T02:31:48+5:30

न्यायालयाने रक्कम जमा करून घेऊन खुर्ची व संगणक साहित्य जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्याचे आदेश.

The seized chair handed over to the Collector! | जप्त केलेली खुर्ची जिल्हाधिका-यांच्या सुपूर्द!

जप्त केलेली खुर्ची जिल्हाधिका-यांच्या सुपूर्द!

बुलडाणा, दि. २३- देऊळगाव राजा तालुक्यातील मंडपगाव येथील शेतकरी बंकटराव उत्तमराव दांडगे (देशमुख) यांच्या वारसास संपादीत जमिनीची वाढीव रक्कम न दिल्यामुळे न्यायालयाच्या आदेशान्वये जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हाधिकारी यांची खुर्ची व संगणक साहित्य जप्तीची कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणात सह दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) बुलडाणा यांच्या न्यायालयात २२ लाख ८६ हजार ९६७ रुपयांच्या मोबदल्याच्या भूसंपादनाची रक्कम जप्त कारवाईच्या दिवशीच २२ सप्टेंबर २0१६ रोजी भरणा करण्यात आली. न्यायालयाने रक्कम जमा करून घेऊन खुर्ची व संगणक साहित्य जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे जप्त केलेली खुर्ची व साहित्य परत करण्यात आले.

Web Title: The seized chair handed over to the Collector!