रेशनचा १४७ क्विंटल अवैध धान्यसाठा जप्त
By Admin | Updated: September 12, 2014 00:07 IST2014-09-12T00:07:05+5:302014-09-12T00:07:05+5:30
जिल्हा पुरवठा विभागाची मेहकर तालुक्यात कारवाई

रेशनचा १४७ क्विंटल अवैध धान्यसाठा जप्त
मेहकर : सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा येथे एका स्वस्त धान्य दुकानदाराने मागील महिन्यात १४७ क्विंटल धान्यसाठा अवैधरित्या जमा करुन ठेवला होता. या महिन्यात पुन्हा नविन माल घेण्यासाठी चालू महिन्याचा माल मंजूर करून घेतला. यावरुन जिल्हा पुरवठा अधिकारी आणि तहसिलदारांनी संयुक्त धाड टाकून १४७ क्विंटल हा साठा जप्त केला आहे. या कारवाईमध्ये ८४ क्विंटल तांदूळ आणि ६३ क्विंटल गव्हाचा साठा मिळून आला.
सर्व धान्यसाठा शासकीय गोदामामध्ये आणून सिल करण्यात आला आहे. सदर कारवाई १९५५ अंतर्गत अत्यावश्यक वस्तु कायद्यांतर्गत करण्यात आली आहे.