भटक्या गुरांच्या पायबंदासाठी कलम १६३ हाच उपाय

By Admin | Updated: October 25, 2014 23:07 IST2014-10-25T23:07:39+5:302014-10-25T23:07:39+5:30

खामगावात मोकाट जनावरांचा हैदोस.

Section 163 is the remedy for naming the cattle | भटक्या गुरांच्या पायबंदासाठी कलम १६३ हाच उपाय

भटक्या गुरांच्या पायबंदासाठी कलम १६३ हाच उपाय

खामगाव (बुलडाणा) : गेल्या काही वर्षांपासून सर्वांसाठीच डोकेदुखी ठरलेली मोकाट जनावरांची समस्या मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. मोकाट जनावरांवर पायबंद घालण्यासाठी ग्रामपंचायत अधिनियमान्वये प्रत्येक ग्रामपंचायतीने आपल्या कार्यक्षेत्रात कलम १६३ या अस्त्राची प्रभावीपणे अंमलबजावणी केल्यास निश्‍चि तच मोकाट जनावरांचा प्रश्न मार्गी लागू शकतो.
संपूर्ण जिल्हाभर, विशेषत: तालुका ठिकाणी आणि शहरीकरणाकडे वाटचाल करणार्‍या सर्वच गावांना अलीकडच्या काही वर्षांत मोकाट जनावरांची समस्या गेल्या काही वर्षांपासून प्रचंड प्रमाणात सतावत आहे. मोकाट जनावरांमुळे जागोजागी वाहतूक कोंडी, वाहन अपघा त या समस्यांसह पादचार्‍यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते आहे. त्यामुळे सातत्याने मोकाट जनावरांचा प्रश्न सर्वत्र ऐरणीवर येऊ लागला आहे. नागरिकांना या मोकाट जनावरांच्या उपद्रवाने जेरीस आणले आहे. मोकाट जनावरांचा बंदोवस्त करा, अशी मागणी लोक सातत्याने करीत आहेत.

*शहरात मोकाट जनावरांचा हैदोस
खामगाव शहरात, विशेषत: नांदुरा रोडवरील टॉवर चौकात मोकाट गुरांचे ठाण असते. वाहनचालकाकडून एखाद्या गुराला इजा झाली, तर मालक समोर येतात. पण तासन्तास गुरे मोकाट अवस्थेत असताना याकडे मालक गंभीर नसतात. त्यासाठी जागृती करण्याची मागणी शहरवासीयांतून होत आहे.

Web Title: Section 163 is the remedy for naming the cattle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.