शिष्यवृत्ती परीक्षेसाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:32 IST2020-12-29T04:32:53+5:302020-12-29T04:32:53+5:30
बुलडाणा : आगामी १४ मार्च राेजी हाेणाऱ्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. आता ...

शिष्यवृत्ती परीक्षेसाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ
बुलडाणा : आगामी १४ मार्च राेजी हाेणाऱ्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. आता ५ जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद असून आतापर्यंत केवळ १५८० विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज केले आहेत.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे-१ यांच्या मार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक वर्ग ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (एन.एम.एम.एस.) ९४ पार्च २०२१ रोजी घेण्यात येणार आहे. यासाठी ९ नोव्हेंबरपासून ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. सन २००७-२००८ पासून इयत्ता आठवीच्या अखेर आर्थिक दुर्बल घटकांतील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक साहाय्य करावे, त्यानुसार विद्यार्थ्यांचे उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण घेण्यास मदत व्हावी, आर्थिक दुर्बलतेमुळे प्रज्ञावान विद्यार्थ्यांची उच्च माध्यमिक स्तरापर्यंत होणारी गळती रोखावी. हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. इयत्ता आठवीतील आर्थिक दुर्बल घटकातील ज्या पालकांचे उत्पन्न १ लाख ५० हजार रुपयांपेक्षा कमी आहे, अशा विद्यार्थ्यांना परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे सदर शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात येते. या परीक्षेसाठी ९ नोव्हेंबर २०२० पासून ऑनलाइन अर्ज भरायला सुरुवात झाली आहे. या परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत आधी ८ डिसेंबर हाेती. त्यानंतर त्यामध्ये वाढ करण्यात येऊन २५ डिसेंबर करण्यात आली हाेती. काेराेनामुळे अनेक विद्यार्थी अर्ज करण्यापासून वंचित राहिल्याने आणखी मुदत वाढवण्यात आली असून आता ५ जानेवारीपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. बुलडाणा जिल्ह्यात विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद असून आतापर्यंत केवळ १५८० विद्यार्थ्यांनीच अर्ज केले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी अर्ज करण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.